महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट, विजांसह वादळी पावसाचा अंदाज
मुंबई : Weather Today Maharashtra : राज्यात सध्या ऑक्टोबर हीटचा प्रभाव जाणवत असून अनेक भागांत उकाडा वाढला आहे. मात्र, या वाढत्या तापमानादरम्यान महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाने काही भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, अमरावती, वर्धा आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटर राहण्याचा अंदाज आहे. या तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
याशिवाय कोकणातील सिंधुदुर्ग तसेच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्येही पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी हवामानातील बदल लक्षात घेऊन काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान, ९ आणि १० ऑक्टोबरला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाच्या अंदाजात नमूद करण्यात आले आहे.
राज्यातील इतर काही भागांतही विजांच्या कडकडाटासह हलका वादळी पाऊस होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी वीजांचा कडकडाट सुरू असताना मोकळ्या जागेत जाणे टाळावे आणि सुरक्षित ठिकाणी राहावे. Weather Today Maharashtra
एकीकडे मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केल्याने तापमानात वाढ होत आहे, तर दुसरीकडे काही भागांत पावसाच्या सरींचा अंदाज आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यातील हवामानात चढ-उतार पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .








