महाराष्ट्रातील या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ; 1 जुलैपासून मिळणार लाभ

मुंबई : DA Hike Latest News :महाराष्ट्र शासनाच्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांसाठी महागाई भत्त्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानुसार महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ करण्यात आली असून, या निर्णयाची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांसाठीही करण्यात येणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 6 नोव्हेंबर 2026 रोजी अधिकृत पत्र जारी केले आहे.

महागाई भत्ता आता 63 टक्के. DA Hike Latest News

केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या व्यय विभागाने 29 ऑक्टोबर 2026 रोजी जारी केलेल्या कार्यालयीन ज्ञापनानुसार महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी 60 टक्के असलेला महागाई भत्ता आता 63 टक्के करण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांनाही सुधारित दराने महागाई भत्ता लागू राहणार आहे.

1 जुलै 2026 पासून मिळणार लाभ. DA Hike Latest News

शासनाच्या पत्रानुसार सुधारित 63 टक्के महागाई भत्ता 1 जुलै 2026 पासून अनुज्ञेय राहणार आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना वाढीव महागाई भत्त्याचा लाभ पूर्वलक्षी प्रभावाने मिळणार आहे.

महागाई भत्त्यातील ही वाढ महागाईच्या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांसाठी दिलासादायक मानली जात आहे.

शासनाचे अधिकृत पत्र जारी

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने या निर्णयाची माहिती संबंधित विभागांना दिली आहे. या पत्रावर अवर सचिव अर्चना जगदीश तामोरे यांची डिजिटल स्वाक्षरी आहे. तसेच शासनाचे हे पत्र महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

महत्त्वाचे : हा आदेश महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्याबाबत आहे. राज्य शासनाच्या सर्व कर्मचारी व पेन्शनधारकांना हा आदेश लागू असल्याचा त्यात उल्लेख नाही.

Leave a Comment