पाटोदा आगारात शिवजयंती सोहळ्याचे आयोजन; विविध मान्यवरांची उपस्थिती.

Irfan Shaikh ✅
2 Min Read

📰 पाटोदा आगारात शिवजयंती सोहळ्याचे आयोजन; विविध मान्यवरांची उपस्थिती. 

पाटोदा (बीड) | प्रतिनिधी

हिंदवी स्वराज्य संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रा.प. पाटोदा आगार, बीड विभाग येथे शुक्रवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता भव्य शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून कर्मचारी व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

📌 कार्यक्रमाची रूपरेषा

सकाळी १० वाजता शिवपूजनाने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर सकाळी १०.३० ते ११.३० या वेळेत रा.प. कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचे शिवचरित्रावरील भाषण होईल. सकाळी ११.३० ते १२.०० या वेळेत कु. शिवानी युवराज मळेकर यांचे शिवचरित्र व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

हे ही वाचा 👉🏻  बँक लॉकर ग्राहकांसाठी आवश्यक बातमी, सरकारने नियमांमध्ये केला मोठा बदल. Bank locker new rules

👥 प्रमुख उपस्थिती

या सोहळ्यास विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. यामध्ये विभाग नियंत्रक अनुजा दुसाने मॅडम, यंत्र अभियंता (चालन) कांडगिरे मॅडम , विभागीय सुरक्षा व दक्षता अधिकारी श्री. भगवान घुगे साहेब , विभागीय वाहतूक अधिकारी राजकुमार दिवटे साहेब , उपयंत्र अभियंता (चालन) अमोल भुसारी साहेब , सहायक यंत्र अभियंता निलेश पवार साहेब , विभागीय वाहतूक अधीक्षक (अपघात) शिवराज हरिभाऊ कराड साहेब , विभागीय लेखा अधिकारी नारायण मुंडे साहेब , विभागीय अभियंता अविनाश मंजुळे साहेब, घोडके साहेब विभागीय कर्मचारी अधिकार 

🎤 कार्यक्रमाचे अध्यक्ष व संयोजन

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक श्री. संतोष डोके साहेब राहणार आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन कर्मचारी मंडळ, रा.प. पाटोदा आगार, बीड विभाग यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हे ही वाचा 👉🏻  देशातील कर्मचाऱ्यांना २०२६ मध्ये सरासरी ९.१% वेतनवाढीची शक्यता; ‘एऑन’च्या अहवालात अंदाज. India salary hike 2026

🍛 स्नेहभोजनाची व्यवस्था

दुपारी १२ ते ५ वाजेपर्यंत स्नेहभोजनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कर्मचाऱ्यांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Pages

Follow:
नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *