पुणे : Government Employees Benefits : पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान करणाऱ्या मतदारांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2026 रोजी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
पदवीधर आणि शिक्षक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1951 मधील कलम 135ब नुसार ही विशेष नैमित्तिक रजा देण्यात आली आहे. ही रजा संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियमित नैमित्तिक रजेव्यतिरिक्त मिळणार आहे.
खासगी कर्मचाऱ्यांना काय मिळणार?
महत्त्वाचे म्हणजे ही भरपगारी विशेष रजा खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या पदवीधर आणि शिक्षक मतदारांना लागू होणार नाही. मात्र, त्यांना मतदान करता यावे यासाठी दोन तासांची विशेष सवलत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
23 ऑक्टोबरला मतदान. Government Employees Benefits
पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी 23 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यामुळे पात्र मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे सरकारी आणि संबंधित आस्थापनांमधील पदवीधर-शिक्षक मतदारांना मतदानासाठी वेळ मिळणार असून, खासगी क्षेत्रातील मतदारांसाठीही मतदानाच्या दिवशी दोन तासांची सवलत उपलब्ध होणार आहे.

नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .








