मुंबई : Government Employee Circular : राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये प्रलंबित असलेली कामे वेळेत पूर्ण व्हावीत आणि नागरिकांची कामे अनावश्यकपणे रखडू नयेत, यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. सामान्य प्रशासन विभागाने ५ ऑक्टोबर २०२६ रोजी शासन परिपत्रक जारी करून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामकाजाबाबत सूचना दिल्या आहेत.
शासकीय कार्यालयांमध्ये अर्ज, निवेदने, प्रस्ताव तसेच विविध प्रकरणे दीर्घकाळ प्रलंबित राहत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा प्रकरणांचा वेळेत निपटारा करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियमितपणे आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
प्रलंबित कामांचा दर महिन्याला आढावा
विभागप्रमुख आणि कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या नियंत्रणाखालील कार्यालयांमध्ये प्रलंबित असलेल्या अर्ज, निवेदने आणि इतर प्रकरणांचा मासिक आढावा घ्यावा, असे शासनाने स्पष्ट केले आहे.
प्रलंबित कामे लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देण्याची जबाबदारीही विभागप्रमुख आणि कार्यालय प्रमुखांवर देण्यात आली आहे.
कार्यालयांना प्रत्यक्ष भेट देण्याच्या सूचना
केवळ कागदोपत्री आढावा न घेता विभागप्रमुख आणि कार्यालय प्रमुखांनी अधीनस्थ कार्यालयांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी करावी, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी प्रलंबित प्रकरणांवर कोणती कार्यवाही झाली आहे, याची माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना देण्याचे सांगण्यात आले आहे.
वेळेत काम न झाल्यास कारवाई. Government Employee Circular
शासकीय कामकाजासाठी ठरवून दिलेल्या कालमर्यादेत कार्यवाही न झाल्यास संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते.
अशा प्रकरणांमध्ये करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
नागरिकांची कामे रखडू नयेत हा मुख्य उद्देश
शासकीय कार्यालयातील कामकाज अधिक गतिमान करणे, प्रलंबित प्रकरणांचा वेळेत निपटारा करणे आणि नागरिकांना अनावश्यक विलंबाचा सामना करावा लागू नये, हा या शासन परिपत्रकाचा मुख्य उद्देश आहे.
त्यामुळे आता शासकीय कार्यालयांमध्ये प्रलंबित कामांचा नियमित आढावा घेतला जाणार असून, कामामध्ये अनावश्यक विलंब करणाऱ्या संबंधितांवर नियमानुसार कारवाई होण्याची शक्यता आहे.

नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .








