मतदारांनी लक्ष द्या! SIR प्रक्रियेत दावे-हरकती दाखल करण्याची मुदत वाढली

मुंबई :  SIR Voter List Maharashtra : महाराष्ट्रातील मतदारांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण अर्थात SIR प्रक्रियेत दावे आणि हरकती दाखल करण्याची मुदत निवडणूक आयोगाने वाढवली आहे. आता नागरिकांना 12 ऑक्टोबर 2026 पर्यंत दावे किंवा हरकती दाखल करता येणार आहेत. यापूर्वी ही मुदत 30 सप्टेंबरपर्यंत होती. निवडणूक आयोगाच्या 26 सप्टेंबर … Read more

महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काला सवलत, शेतकऱ्यांसाठीही मोठ्या उपाययोजना

मुंबई : Maharashtra Drought Relief 2026  : राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगामातील पिकांवर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले आहेत. या तालुक्यांमध्ये दुष्काळ व्यवस्थापनातील ‘ट्रिगर-१’ निकष लागू झाले आहेत. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर सरकारकडून प्रभावित भागांसाठी विविध सवलती आणि मदतीच्या उपाययोजना लागू करण्यात येणार … Read more

कर्मचाऱ्याला सेवेतून काढण्याबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; नियुक्ती आणि बडतर्फीच्या अधिकारावर स्पष्ट भूमिका

नवी दिल्ली : Supreme Court Employee Case :   सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवासुरक्षेशी संबंधित एका महत्त्वाच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. एखाद्या कर्मचाऱ्याला सेवेतून काढणारा अधिकारी हा त्याची नियुक्ती करणाऱ्या अधिकाऱ्यापेक्षा कनिष्ठ दर्जाचा नसल्यास, संविधानातील अनुच्छेद 311(1) अंतर्गत असलेली घटनात्मक अडचण लागू होत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांवरील … Read more

बँक कर्मचाऱ्यांचा ३ दिवसांचा संप; ५ दिवसांच्या बँकिंगची मागणी फेटाळली, ग्राहकांवरही परिणाम होणार

मुंबई : Bank Employees Strike 2026 :   बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पाच दिवसांचा बँकिंग आठवडा लागू करावा, या मागणीसाठी बँक कर्मचारी संघटनांनी पुन्हा आंदोलनाची भूमिका घेतली आहे. मागणीवर अद्याप तोडगा न निघाल्याने 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2026 या तीन दिवसांत बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत.  या संपामुळे देशभरातील बँकांच्या नियमित कामकाजावर … Read more

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट; सप्टेंबरचा पगार आणि पेन्शन आगाऊ मिळणार

नवी दिल्ली : Central Government Employees :  केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस प्रस्तावित बँक संपाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पगार आणि पेन्शनच्या वितरणाबाबत महत्त्वाची व्यवस्था केली आहे. त्यानुसार सप्टेंबर महिन्याचा पगार तसेच पेन्शन 25 सप्टेंबर 2026 पासून वितरित करण्यास परवानगी देण्यात आली आहे. बँक संपाच्या पार्श्वभूमीवर निर्णय 28 … Read more

UPI पेमेंटवर GST लागणार? ₹10 हजारांच्या व्यवहाराचे नेमके गणित समजून घ्या

नवी दिल्ली :  GST on UPI Payments : आजकाल छोट्या दुकानापासून मोठ्या व्यवसायापर्यंत जवळपास सर्वत्र UPI पेमेंटचा वापर केला जातो. त्यामुळे UPI व्यवहारांवर MDR आणि GST कसा लागू होतो, ग्राहकाच्या खिशातून पैसे जाणार का आणि व्यापाऱ्याला किती रक्कम मिळते, याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न आहेत. सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट समजून घेणे महत्त्वाचे आहे. ₹10 हजारांच्या … Read more

राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या बदली धोरणाच्या प्रारूपावर हरकती मागविल्या, जाणुन घ्या.

मुंबई :  Maharashtra Govt employees Transfer :  राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित आणि सर्वसमावेशक धोरणाचे शासन निर्णय प्रारूप प्रसिद्ध करण्यात आले आहे. या प्रारूपात शिक्षकांच्या बदल्यांशी संबंधित विविध नियम, पात्रता, विशेष संवर्ग तसेच अवघड आणि सर्वसाधारण क्षेत्राबाबतच्या तरतुदी स्पष्ट करण्यात आल्या आहेत. या प्रारूपावर काही हरकती किंवा सूचना असल्यास त्या शासनाकडे पुढील … Read more

EPFO नियमांमध्ये मोठा बदल; 35 हजार पगार असणाऱ्यांच्या पेन्शनवर काय परिणाम होणार?

नवी दिल्ली : EPS Pension Calculation :  कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेशी (EPFO) संबंधित नियमांमध्ये केंद्र सरकारकडून महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. EPF अंतर्गत अनिवार्य कव्हरेजसाठी असलेली वेतन मर्यादा १५ हजार रुपयांवरून २५ हजार रुपये करण्यात आली आहे. या बदलामुळे १५ ते २५ हजार रुपये वेतन असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना EPFOच्या सामाजिक सुरक्षा योजनांच्या कक्षेत येण्याची … Read more

सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी; DA मध्ये 8 टक्के वाढ, आता 50 टक्के महागाई भत्ता

नवी दिल्ली :  Dearness Allowance Increase :  सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पंजाब सरकारने राज्यातील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात (DA) 8 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे DA चा दर 42 टक्क्यांवरून थेट 50 टक्क्यांवर पोहोचला आहे. या निर्णयाचा फायदा राज्यातील सुमारे 8 लाख कर्मचारी आणि पेन्शनधारकांना … Read more

एसटी कर्मचाऱ्यांचे ‘पीएफ’चे पैसे रखडले; १ हजार कर्मचाऱ्यांना अग्रिम रकमेची प्रतीक्षा

मुंबई :  EPF Advance Claim :  एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारातून दरमहा भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कम कपात केली जाते. मात्र, ही रक्कम पीएफ ट्रस्टमध्ये वेळेवर जमा होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून सुमारे १ हजार कर्मचाऱ्यांना पीएफचे अग्रिम मिळाले नसल्याचे सांगण्यात येत आहे. एसटी महामंडळातील … Read more