मुंबई : Pension Scheme Latest News India : मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि नवीन राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) संदर्भातील करार रद्द करावा, अशी मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे. प्रशासनाने हा निर्णय मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संघटनांच्या नेत्यांनी दिला आहे.
मुंबई महानगरपालिकेतील कामगार, कर्मचारी, अधिकारी, अभियंते, परिचारिका, तंत्रज्ञ, सुरक्षा रक्षक आणि शिक्षकांसह विविध संवर्गांतील कर्मचाऱ्यांना एनपीएस लागू करण्याच्या निर्णयाला कर्मचारी संघटनांनी विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर कामगार-कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे बाबा कदम होते. महानगरपालिका प्रशासनाने कर्मचारी संघटनांशी पुरेशी चर्चा न करता एनपीएस लागू करण्याचा निर्णय घेतल्याचा आक्षेप यावेळी उपस्थित करण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करून हा निर्णय रद्द करावा आणि त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी करण्यात आली.
कर्मचाऱ्यांच्या जमा निधीबाबत चिंता. Pension Scheme Latest News India
संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१०-११ ते २०२४-२५ या कालावधीत कर्मचाऱ्यांशी संबंधित सुमारे ६,२०० कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे. हा निधी विविध आर्थिक संस्थांमध्ये गुंतवला जाणार असल्याच्या मुद्द्यावरही मेळाव्यात चिंता व्यक्त करण्यात आली.
कर्मचाऱ्यांच्या कष्टाच्या पैशांच्या सुरक्षिततेबाबत आणि भविष्यातील निवृत्तिवेतनाबाबत स्पष्टता मिळावी, अशी भूमिका संघटनांच्या प्रतिनिधींनी मांडली.
आंदोलनाची पुढील दिशा लवकरच ठरणार
एनपीएसला विरोध करण्यासाठी सर्व कर्मचारी संघटनांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे, असे आवाहन मेळाव्यात करण्यात आले. पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी विविध संघटनांच्या नेत्यांची बैठक लवकरच आयोजित केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली. Pension Scheme Latest News India
या प्रश्नावर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनाही पत्र देण्यात आल्याचे संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले.
दरम्यान, एनपीएस संदर्भातील निर्णय मागे घेऊन मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत प्रशासन काय भूमिका घेते, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .








