मुंबई : Post Office Insurance : असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या श्रमिकांसाठी आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाची योजना उपलब्ध आहे. Antyodaya Shramik Suraksha Yojana या योजनेच्या माध्यमातून पात्र श्रमिकांना कमी प्रीमियममध्ये अपघाती विमा संरक्षण मिळू शकते. ही योजना इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने (IPPB) सुरू केली असून, सुरुवातीला गुजरातमधील खेडा जिल्ह्यात पायलट स्वरूपात सुरू करण्यात आली होती.

या योजनेत ₹499 वार्षिक प्रीमियममध्ये १० लाख रुपयांपर्यंतचे अपघाती विमा संरक्षण, तर ₹289 प्रीमियममध्ये ५ लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण उपलब्ध आहे. यामध्ये अपघाती मृत्यू, अपंगत्व यांसह काही अतिरिक्त लाभांचाही समावेश आहे.
योजनेच्या माहितीनुसार, अपघातामुळे मृत्यू झाल्यास विमा रकमेचा लाभ नॉमिनीला मिळू शकतो. अपघाती अपंगत्वाच्या परिस्थितीतही पॉलिसीच्या अटी व शर्तींनुसार लाभ दिला जातो. याशिवाय पात्र प्रकरणांमध्ये अपघाती वैद्यकीय खर्च, मुलांच्या शिक्षणासाठी मदत आणि रुग्णालयात दाखल झाल्यानंतर काही अतिरिक्त लाभ मिळू शकतात.
विशेष म्हणजे ही योजना ई-श्रम पोर्टलवर नोंदणीकृत श्रमिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी IPPB ने केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयासोबत सहकार्य केले आहे. सरकारच्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२५ पर्यंत या योजनेचा लाभ घेणाऱ्या कामगार आणि कुटुंबांची संख्या ८.४२ लाखांहून अधिक होती.
योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट देऊन किंवा पोस्टमन/ग्रामीण डाक सेवकाशी संपर्क करून माहिती घेता येते. अधिकृत माहितीसाठी IPPB ने 155299 हा हेल्पलाइन क्रमांकही दिला आहे. Post Office Insurance
दरम्यान, विमा योजनेचे लाभ घेताना पात्रता, प्रीमियम, कव्हरेज आणि पॉलिसीच्या अटी काळजीपूर्वक तपासणे आवश्यक आहे. कारण प्रत्यक्ष लाभ विमा पॉलिसीतील लागू अटी व शर्तींनुसारच मिळतो.

नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .







