उद्या केंद्राचा अर्थसंकल्प, करसवलत, आरोग्य, प्रवास जेष्ठ नागरिक आणि उद्योगांसाठी काय मिळणार? Union Budget 2026

उद्या केंद्राचा अर्थसंकल्प, करसवलत, आरोग्य, प्रवास जेष्ठ नागरिक आणि उद्योगांसाठी काय मिळणार? Union Budget 2026 

Union Budget 2026 : नमस्कार मित्रानो देशाच्या आर्थिक दिशेला आकार देणारा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2026 रोजी संसदेत सादर होणार आहे. सलग नवव्यांदा अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प मांडणार असून, पगारदार वर्ग, मध्यमवर्ग आणि उद्योगजगतात मोठी उत्सुकता आहे.

करसवलत, जीएसटी दिलासा, स्वस्त घरे, आरोग्यसेवा, हवाई प्रवास आणि नव्या उद्योगांसाठी महत्त्वाच्या घोषणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील काही वर्षांतील सुधारणांची दिशा पाहता, यंदाचा अर्थसंकल्प Reform, Perform आणि Transform या धोरणाशी सुसंगत असण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा 👇🏻  पॅन कार्डचे नवीन नियम प्रत्येकाला माहित असणे आवश्यक आहे. Pan card new rules 2025

आर्थिक सर्वेक्षणानुसार भारताची अर्थव्यवस्था 2026 मध्ये 7.4 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. करदात्यांची संख्या वाढत असून सरकारी महसूलही मजबूत होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सरकारकडे विकासाभिमुख आणि जनतेला दिलासा देणारा अर्थसंकल्प सादर करण्याची संधी आहे. Union Budget 2026 

आरोग्य क्षेत्रासाठी परवडणाऱ्या उपचारांवर भर देण्याची मागणी सातत्याने होत आहे. डिजिटल हेल्थ, वैद्यकीय उपकरणांवरील कर कपात आणि आरोग्य सेवांचा खर्च कमी करण्यासाठी ठोस पावले उचलली जाऊ शकतात. यामुळे देश अधिक निरोगी होऊन 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार होण्यास हातभार लागेल.

प्रवास आणि एव्हिएशन क्षेत्राकडूनही अर्थसंकल्पाकडे अपेक्षेने पाहिले जात आहे. परदेशी प्रवासासाठी लागू असलेल्या TCS नियमांमध्ये सुलभता, तसेच ATF ला GST च्या चौकटीत आणल्यास हवाई प्रवास सामान्य नागरिकांसाठी स्वस्त होण्याची शक्यता आहे. Union Budget 2026 

हे ही वाचा 👇🏻  आठव्या वेतन आयोगाची वेबसाइट सुरु, पगारवाढ कधी सुरू होईल? पहा. 8th pay website

दरम्यान, क्रिप्टोकरन्सीवरील 30 टक्के फ्लॅट कराबाबत पुनर्विचार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नियम अधिक स्पष्ट आणि सोपे केल्यास गुंतवणूकदारांचा विश्वास वाढू शकतो. कॉस्मेस्युटिकल्स उद्योगानेही GST दर कमी करण्याची मागणी केली आहे.


अर्थसंकल्प 2026 कडून सर्वसामान्यांच्या प्रमुख अपेक्षा. Union Budget 2026 

  • इन्कम टॅक्समध्ये दिलासा आणि करप्रणाली सुलभ होण्याची शक्यता
  • आरोग्य सेवांसाठी अधिक निधी आणि खर्चात कपात
  • ATF GST अंतर्गत आल्यास हवाई प्रवास स्वस्त होऊ शकतो
  • परदेशी प्रवासावरील TCS नियमांमध्ये बदल होण्याची शक्यता
  • क्रिप्टो आणि कॉस्मेस्युटिकल्स उद्योगासाठी करसुधारणांची अपेक्षा

Leave a Comment