Close Visit MahaNews12

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! रेल्वे ने आणले हे नवीन नियम 

Railway Travel Rules  : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेकडून ऑक्टोबर महिन्यात तिकीट तपासणीची विशेष मोहीम राबवली जाणार आहे. १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ही मोहीम सुरू राहणार असून, प्रवाशांच्या तिकिटांची तसेच आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे.

या मोहिमेदरम्यान विशेषतः सवलतीच्या तिकिटांवर प्रवास करणारे प्रवासी, आरक्षणाच्या विविध कोट्यांचा वापर करणारे प्रवासी तसेच पास आणि इतर सुविधांचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांकडे लक्ष दिले जाणार आहे.

प्रवाशांनी ओळखपत्र जवळ ठेवणे महत्त्वाचे

रेल्वेने प्रवास करताना केवळ तिकीट असणे पुरेसे नाही. काही प्रवर्गांना सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा दिली जाते. अशा प्रवाशांनी तिकिटासोबत संबंधित मूळ ओळखपत्र आणि पात्रतेचा पुरावा जवळ ठेवणे आवश्यक आहे.

एका तिकिटावर अनेक प्रवासी प्रवास करत असतील, तर आरक्षणाच्या वेळी दिलेले संबंधित मूळ ओळखपत्र सोबत असणे महत्त्वाचे आहे. तपासणीच्या वेळी आवश्यक कागदपत्रे दाखवता आली नाहीत, तर रेल्वेच्या नियमांनुसार कारवाई होऊ शकते.

ई-पास आणि PTO बाबतही तपासणी. Railway Travel Rules

ई-पास किंवा PTOच्या माध्यमातून रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचीही तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे प्रवासाला निघण्यापूर्वी संबंधित अधिकृत तिकीट किंवा प्रवासाचे कागदपत्र घेतले आहे का, याची खात्री करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अनारक्षित तिकिटांवरही रेल्वेचे लक्ष. Railway Travel Rules

या विशेष मोहिमेत फक्त आरक्षित तिकिटांची तपासणी होणार नाही. अनारक्षित तिकिटांचीही तपासणी केली जाणार आहे. तिकीट वैध आहे की नाही, याची तपासणी रेल्वे कर्मचारी आवश्यकतेनुसार डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून करू शकतात.

बनावट तिकीट, सवलतीच्या तिकिटांचा गैरवापर किंवा आरक्षणाच्या सुविधेचा चुकीचा वापर आढळल्यास रेल्वेच्या नियमानुसार कारवाई केली जाऊ शकते.

प्रवाशांनी काय काळजी घ्यावी?

ऑक्टोबर महिन्यात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आपले तिकीट व्यवस्थित तपासून घ्यावे. सवलतीच्या तिकिटावर प्रवास करत असल्यास संबंधित पात्रतेची कागदपत्रे आणि मूळ ओळखपत्र सोबत ठेवावे. तिकीट तपासणीदरम्यान रेल्वे कर्मचाऱ्यांना आवश्यक सहकार्य करावे, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Comment