राज्यातील या सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृतिबंध लागु, 18 फेब्रुवारी रोजी GR निर्गमित.Maharashtra employees Update   

Irfan Shaikh ✅
2 Min Read

 मुंबई | दि. 18 फेब्रुवारी 2026

Maharashtra employees Update :  राज्यातील खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृतीबंध लागू करण्याबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मार्फत दि. 18.02.2026 रोजी हा निर्णय निर्गमित करण्यात आला.

निर्णयात काय नमूद?

शासन निर्णयानुसार राज्यातील इयत्ता 5 वी ते 12 वी पर्यंत चालणाऱ्या मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित पदरचना लागू करण्यात आली आहे. यामध्ये विशेषतः लिपिकवर्गीय पदांच्या मंजुरीसंदर्भात स्पष्ट निकष निश्चित करण्यात आले आहेत.

हे ही वाचा 👇🏻  फेब्रुवारी पेड इन मार्च वेतनासाठी निधी वितरण; 5 मार्च 2026 रोजी महत्त्वाचा शासन निर्णय जारी. Government Employees Salary Update

पटसंख्येनुसार पदमंजुरी. maharashtra employees Update 

  • इयत्ता 5 वी ते 12 वी ची पटसंख्या 500 पर्यंत असल्यास 1 कनिष्ठ लिपिक पद मंजूर करण्यात येणार आहे.

तसेच, दि. 18.01.2019 रोजीच्या शासन निर्णयातील लिपिकवर्गीय पदांबाबत सुधारित निर्देश जारी करण्यात आले आहेत.

15 मार्च 2024 च्या निकषांनुसार

दि. 15.03.2024 च्या शासन निर्णयानुसार, जर इयत्ता 5 वी ते 12 वी साठी किमान तीन शिक्षक अनुज्ञेय असतील, तर खालीलप्रमाणे पदमंजुरी देण्यात येईल:

  • कनिष्ठ लिपिक – 01
  • वरिष्ठ लिपिक – 00
  • मुख्य लिपिक – 00

यामुळे कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये अतिरिक्त लिपिक पदांची मंजुरी देण्यात येणार नाही.

हे ही वाचा 👇🏻  आयकर कायद्यात मोठे बदल,  पहा संपूर्ण माहिती. Income tax new rules February

प्रशासनावर परिणाम. maharashtra employees Update 

या निर्णयामुळे शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या पदरचनेत एकसमानता येणार असून, शाळांमधील प्रशासकीय कामकाज अधिक सुटसुटीत होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित शाळा व्यवस्थापनांनी सुधारित आकृतीबंधानुसार आवश्यक प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

राज्यातील हजारो माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी हा शासन निर्णय महत्त्वपूर्ण ठरत असून, शिक्षण क्षेत्रात प्रशासकीय स्पष्टता आणण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

Follow:
नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *