लाडकी बहीण’ योजनेत गैरवापर उघड; ५ हजार कर्मचारी रडारवर, जानेवारी – फेब्रुवारी चा 3000 चा हप्ता लवकरच जमा. Ladaki bahin yojana 2026

Irfan Shaikh ✅
3 Min Read

लाडकी बहीण’ योजनेत गैरवापर उघड; ५ हजार कर्मचारी रडारवर, नोव्हेंबरचा ₹1500 हप्ता लवकरच जमा. Ladaki bahin yojana 2026

मुंबई : 

Ladaki bahin yojana 2026 : महायुती सरकारची महत्वाकांक्षी अंतर्गत जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. योजनेनुसार प्रत्येक लाभार्थीला ₹1500 मदत देण्यात येते. राज्यातील अडीच कोटींपेक्षा अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून, त्यांची ई-केवायसी प्रक्रिया सध्या सुरू आहे.

दरम्यान, योजनेचा गैरवापर झाल्याच्या धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. विविध विभागांतील सरकारी कर्मचारी, शिक्षक, पोलिस आणि जिल्हा परिषद कर्मचारी यांनीही या योजनेचा लाभ घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.


५ हजार कर्मचारी, ३ हजार शिक्षक संशयाच्या भोवऱ्यात

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,

  • सुमारे ५ हजार सरकारी कर्मचारी
  • ३ हजार शिक्षक
  • काही जिल्हा परिषद कर्मचारी आणि पोलिस
हे ही वाचा 👇🏻  भारत बंद १२ फेब्रुवारी २०२६: आज काय बंद राहणार? बँका, बस, शाळांवर परिणाम; जाणून घ्या संपूर्ण माहिती. Bharat Band Update  2026

यांनी उत्पन्न मर्यादा (वार्षिक ₹2.5 लाख) ओलांडूनही लाभ घेतल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निवडणूक काळातील घाई-गडबडीचा फायदा घेत काहींनी अनधिकृतरीत्या अर्ज केल्याचे समोर येत आहे.

Ladaki bahin yojana 2026


कठोर कारवाईची तयारी

या प्रकरणाचा तपास सुरू असून, संबंधित विभागांची नावे लवकरच निश्चित केली जाणार आहेत. त्यानंतर:

  • संबंधित विभागांना पत्रे पाठवली जातील
  • शिस्तभंग कारवाई केली जाईल
  • गैरफायदा घेतलेली रक्कम वसूल केली जाईल
  • संबंधित कर्मचाऱ्यांची पगारवाढ रोखण्याची शक्यता

कडून पुढील काळात ही कारवाई प्रभावीपणे राबवली जाणार असल्याची माहिती आहे.

योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे. पूर्वी ही अंतिम मुदत १८ नोव्हेंबर होती; मात्र लाखो महिलांनी प्रक्रिया पूर्ण न केल्याने ती आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली होती, परंतु अजूनही काही महिला यापासून वंचित होत्या त्यामुळे फेब्रुवारी मध्ये परत एकदा पोर्टल सुरु करण्यात आलेले आहे .

हे ही वाचा 👇🏻  रेल्वेने बर्थ सिस्टीममध्ये मोठा बदल, वेटिंग तिकिट असलेल्यांना मोठा दिलासा.Railway waiting ticket news

⚠️ ई-केवायसी न केल्यास भविष्यातील हप्ते मिळणार नाहीत, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

Ladaki bahin yojana 2026


पारदर्शकतेसाठी कडक पावले

‘लाडकी बहीण’ योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या कमजोर महिलांना दरमहा ₹1500 ची मदत मिळत आहे. मात्र, काही अपात्र व्यक्तींनी गैरफायदा घेतल्याने योजनेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सरकारकडून आता डेटा पडताळणी, उत्पन्न तपासणी आणि विभागनिहाय चौकशी वेगाने सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई होणार असल्याचे संकेत आहेत.


महत्त्वाचे

  • जानेवारी आणि फेब्रुवारी चा हप्ता लवकरच खात्यात
  • ई-केवायसी करा; 
  • अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई अटळ

योजनेचा लाभ घेणाऱ्या पात्र महिलांनी आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवावीत, तर अपात्र व्यक्तींनी पुढील कारवाई टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Follow:
नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *