मानधन व रोजंदारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! शासनाकडून मागण्यांची दखल
मुंबई : Government Job Regularization : राज्यातील विविध क्रीडा संकुलांमध्ये मानधन, रोजंदारी आणि कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासनाने महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याच्या मागणीची शासन स्तरावर नोंद घेण्यात आली असून, त्याबाबत पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन क्रीडा विभागाकडून देण्यात आले आहे.
राज्य सरकारी गट-ड कर्मचारी मध्यवर्ती महासंघाने मानधन व रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शासनाकडे निवेदन सादर केले होते. या मागण्यांवर बैठक आयोजित न झाल्यास 22 सप्टेंबर 2026 पासून मुंबईतील आझाद मैदान येथे उपोषण करण्याचा इशारा महासंघाकडून देण्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर क्रीडा विभागाने संबंधित महासंघाला पत्राद्वारे महत्त्वाची माहिती दिली आहे. 1 सप्टेंबर 2026 रोजी सादर करण्यात आलेल्या निवेदनाची तसेच कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची शासन स्तरावर नोंद घेण्यात आल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
कर्मचाऱ्यांच्या मागण्यांमुळे होणारे प्रशासकीय आणि आर्थिक परिणाम, तसेच सध्या लागू असलेले शासन नियम व धोरणे यांचा विचार करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे शासनाने म्हटले आहे. Government Job Regularization
दरम्यान, या प्रकरणी उपमुख्यमंत्री तथा क्रीडामंत्र्यांसोबत बैठक घेण्यासाठी वेळ निश्चित करून त्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचेही क्रीडा विभागाने स्पष्ट केले आहे. बैठकीची माहिती संबंधित महासंघाला देण्यात येणार आहे.
शासनाच्या या पत्रामुळे मानधन, रोजंदारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर पुढील काळात चर्चा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, या पत्रातून कर्मचाऱ्यांना तात्काळ किंवा थेट कायमस्वरूपी शासन सेवेत सामावून घेण्याचा अंतिम निर्णय झालेला नाही. सध्या शासनाने मागण्यांची दखल घेऊन पुढील कार्यवाही आणि संबंधित मंत्र्यांसोबत बैठक घेण्याची भूमिका घेतली आहे.
तसेच 22 सप्टेंबरपासून आझाद मैदान येथे नियोजित करण्यात आलेले उपोषण स्थगित करून शासनाला सहकार्य करावे, अशी विनंती क्रीडा विभागाने महासंघ, कर्मचारी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना केली आहे. Government Job Regularization

नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .








