Close Visit MahaNews12

महागाई भत्त्यात वाढीसह किमान वेतनात वाढ; राज्य शासनाचे महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी. DA Allowance News.

महागाई भत्त्यात वाढीसह किमान वेतनात वाढ; राज्य शासनाचे महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी. DA Allowance News.

DA Allowance News  : राज्यातील कामगारांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्य शासनाकडून महागाई भत्ता (DA) वाढ आणि किमान वेतन वाढीबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.
दि. 01 जानेवारी 2026 ते 30 जून 2026 या कालावधीसाठी सुधारित विशेष महागाई भत्ता आणि किमान वेतन जाहीर करण्यात आले आहे.

पदनिहाय वेतन वाढ जाहीर

शासनाच्या परिपत्रकानुसार ही वेतनवाढ पदनिहाय करण्यात आली असून, कुशल, अर्धकुशल व अकुशल कामगारांसाठी स्वतंत्र दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार किमान वेतन आणि विशेष महागाई भत्ताचे दर वेगवेगळे असणार आहेत.

कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ?

ही वाढ कारखाना अधिनियम 1948 अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या उद्योग, कारखाने, आस्थापना, दुकाने तसेच इतर नोंदणीकृत संस्थांमध्ये कार्यरत कामगारांना लागू राहणार आहे. या अंतर्गत काम करणाऱ्या लाखो कामगारांना याचा थेट लाभ मिळणार आहे.

किमान वेतन आणि विशेष डी.ए किती?

नवीन निर्णयानुसार

  • किमान वेतन : ₹16,620/- पर्यंत
  • विशेष महागाई भत्ता : ₹3,135/- पर्यंत

वेतन व डी.ए.चे हे दर कामगारांच्या कौशल्यानुसार (कुशल / अकुशल) वेगवेगळे असतील.

67 अनुसूचित उद्योगांना लाभ

ही वेतनवाढ राज्यातील 67 अनुसूचित उद्योग क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी लागू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे लाखो कामगारांच्या उत्पन्नात वाढ होणार असून, त्यांच्या दैनंदिन खर्चाचा भार काही प्रमाणात हलका होणार आहे.

कामगारांची मागणी अखेर मान्य. DA Allowance News 

किमान वेतन व महागाई भत्ता वाढीची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून कामगार संघटनांकडून करण्यात येत होती. अखेर शासनाने सकारात्मक निर्णय घेत कामगारांना मोठा दिलासा दिला आहे.

🙋🏻‍♂️ *राज्य सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आजचे 03 महत्त्वाचे शासन निर्णय.*

राज्य सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आजचे 03 महत्त्वाचे शासन निर्णय. State Employees Latest News

 

➡️ सविस्तर पदनिहाय किमान वेतन व विशेष महागाई भत्ताचे दर संबंधित परिपत्रकात पाहता येणार आहेत.

Leave a Comment