ऑगस्ट मध्ये राज्य कर्मचाऱ्यांना 60% DA तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना 63 टक्के DA वाढ, जाणुन घ्या.

Irfan Shaikh ✅

नवी दिल्ली : DA Allowance Augast  केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ८व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीपूर्वीच महागाई भत्त्यात (DA) वाढ होण्याची शक्यता आहे. जून 2026 च्या अखेरच्या CPI-IW आकडेवारीनंतर जुलै 2026 पासूनच्या DA वाढीचे गणित जवळपास स्पष्ट झाले आहे.

DA मध्ये ३ टक्के वाढीची शक्यता

केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या ६० टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे. जून 2026 मध्ये All India Consumer Price Index for Industrial Workers (CPI-IW) निर्देशांक १५१.९ वर पोहोचला. मे महिन्यात हा निर्देशांक १५०.८ होता. या आकडेवारीच्या आधारे ७व्या वेतन आयोगाच्या सूत्रानुसार DA सुमारे ६३.७५ टक्के येत असल्याचे गणित आहे. त्यामुळे DA मध्ये ३ टक्के वाढ होऊन तो ६३ टक्के होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा 👉🏻  पॅन कार्डशी संबंधित ही चूक महागात पडू शकते, प्रत्येक व्यवहारावर तुम्हाला ₹10,000 दंड भरावा लागेल. Pan Card Update

पगारात किती वाढ होणार?

DA हा कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या टक्केवारीनुसार ठरतो. त्यामुळे DA मध्ये ३ टक्के वाढ झाल्यास कर्मचाऱ्यांच्या Basic Pay नुसार पगारात वाढ होईल.

उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्याचे Basic Pay ₹18,000 असल्यास ३ टक्के DA वाढीमुळे महिन्याला सुमारे ₹540 अतिरिक्त मिळू शकतात. Basic Pay जास्त असेल तर ही वाढही त्यानुसार अधिक असेल.

जुलैपासून लाभ मिळण्याची शक्यता

जुलै २०२६ पासून लागू होणाऱ्या DA वाढीसाठी जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या CPI-IW आकडेवारीचा आधार घेतला जातो. जून महिन्याचा अंतिम आकडा जाहीर झाल्याने DA वाढीचे गणित पूर्ण झाले आहे. मात्र अंतिम निर्णय केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतरच निश्चित होईल.

हे ही वाचा 👉🏻  1 तारखे पासून लागू होणार क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी नवीन नियम.  Credit Card new rules

८वा वेतन आयोग येण्याआधीच दिलासा

केंद्रीय कर्मचाऱ्यांचे लक्ष सध्या ८व्या वेतन आयोगाकडेही लागले आहे. नवीन वेतन आयोगामुळे भविष्यात Basic Pay, भत्ते आणि इतर वेतन घटकांमध्ये बदल होण्याची अपेक्षा आहे. मात्र त्याआधी नियमित DA सुधारणा होणे अपेक्षित आहे.

त्यामुळे ८व्या वेतन आयोगाबाबत अंतिम निर्णय किंवा अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू असतानाच केंद्रीय कर्मचाऱ्यांना DA वाढीच्या रूपाने अतिरिक्त आर्थिक दिलासा मिळू शकतो.

महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांसाठीही महत्त्वाचे अपडेट: DA Allowance Augast Maharashtra 

महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या DA बाबतही महत्त्वाची माहिती आहे. महाराष्ट्र सरकारने 2026 मध्ये DA मध्ये 3 टक्के वाढ करून तो 55 टक्क्यांवरून 58 टक्के केला आहे. ही वाढ राज्यातील 5वा, 6वा आणि 7वा वेतन आयोग लागू असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी करण्यात आली आहे.
त्यामुळे आता लवकरच महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे ५८ टक्के वरून ६० टक्के महागाई भत्ता लागू करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. या वाढीचा लाभ निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनाही मिळेल .

हे ही वाचा 👉🏻  आठव्या वेतन आयोगापासून ते EPFO पर्यंत, हे नियम नवीन वर्ष २०२६ मध्ये बदलतील. NEW RULES IN 2026

महत्त्वाचे : ३ टक्के DA वाढीची शक्यता CPI-IW आकडेवारीवर आधारित आहे. केंद्र सरकारची अधिकृत मंजुरी आणि घोषणा होईपर्यंत याला अंतिम निर्णय समजू नये.

Pages

Follow:
नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *