Close Visit MahaNews12

मतदारांसाठी महत्त्वाची बातमी! SIR प्रक्रियेत मोठा बदल; दावे-हरकतींची मुदत वाढली

मुंबई : प्रतिनिधी :  SIR Voter List 2026 : महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाला (SIR – Special Intensive Revision) वेग आला असून, या प्रक्रियेदरम्यान मतदारांना दिलासा देणारी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाने 28 सप्टेंबर 2026 रोजी जारी केलेल्या पत्रानुसार SIR प्रक्रियेत काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

SIR प्रक्रियेदरम्यान ज्या मतदारांना.

‘Unmapped’ किंवा Logical Discrepancies मुळे नोटीस बजावण्यात आली आहे, अशा मतदारांच्या घरी जाऊन आवश्यक कागदपत्रे संकलित करण्याची जबाबदारी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) पार पाडणार आहेत. संकलित कागदपत्रे पुढील निर्णयासाठी मतदार नोंदणी अधिकारी (ERO) यांच्या ECINET पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहेत.

मतदारांना कार्यालयात जाण्याची गरज नाही? SIR Voter List 2026

निवडणूक कार्यालयाच्या सूचनेनुसार, अशा मतदारांना प्रत्यक्ष सुनावणीसाठी ERO किंवा AERO यांच्या कार्यालयात जाण्याची आवश्यकता सामान्य परिस्थितीत राहणार नाही. मात्र, अपवादात्मक परिस्थितीत मतदार नोंदणी अधिकाऱ्याला प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन पद्धतीने सुनावणी घेण्याची आवश्यकता वाटल्यास त्यानुसार कार्यवाही केली जाऊ शकते.

मतदाराला सुनावणीच्या वेळी स्वतः उपस्थित राहणे शक्य नसल्यास, त्याच्या वतीने कुटुंबातील किंवा परिसरातील अन्य व्यक्तीला परवानगी देण्याची सुविधाही उपलब्ध करून देता येणार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

दावे-हरकती दाखल करण्यासाठी मोठी मुदतवाढ. SIR Voter List 2026

महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार दावे आणि हरकती दाखल करण्याची मुदत 12 ऑक्टोबर 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

यासोबतच महाराष्ट्रातील नोटिसा तसेच दावे-हरकती निकाली काढण्याची मुदत 10 नोव्हेंबर 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे SIR प्रक्रियेत संबंधित मतदारांना आपले म्हणणे मांडण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळणार आहे.

रात्री निवाऱ्यात राहणाऱ्यांसाठीही विशेष व्यवस्था. SIR Voter List 2026

जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी गरजेनुसार रात्रीच्या निवाऱ्यांमध्ये राहणारे नागरिक, मजूर, गरीब आणि बेघर व्यक्ती यांच्यासाठी पुरेशा संख्येने मदत कक्ष सुरू करण्याची किंवा विशेष शिबिरांचे आयोजन करण्याची सूचना देण्यात आली आहे.

निवडणूक यंत्रणेमार्फत मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आणि BLO यांना या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

थोडक्यात, SIR प्रक्रियेत नोटीस मिळालेल्या मतदारांनी घाबरून जाण्याची गरज नसून, संबंधित BLO मार्फत आवश्यक कागदपत्रे संकलित करण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच दावे-हरकती दाखल करण्यासाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदत उपलब्ध आहे.

1 thought on “मतदारांसाठी महत्त्वाची बातमी! SIR प्रक्रियेत मोठा बदल; दावे-हरकतींची मुदत वाढली”

Leave a Comment