मुंबई : Maharashtra Rain News : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला, तरी महाराष्ट्रातून अद्याप पावसाने पूर्णपणे माघार घेतलेली नाही. दरम्यान, नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी राजस्थानच्या काही भागातून परतीचा प्रवास सुरू केला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, राजस्थानमधील काही भागातून मॉन्सून माघारी फिरण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात राजस्थानसह पंजाब आणि सौराष्ट्र-कच्छच्या काही भागांतही मॉन्सूनची माघार पुढे सरकण्याची शक्यता आहे.
मात्र, मॉन्सूनच्या परतीला सुरुवात झाली असली तरी महाराष्ट्रातील हवामानावर त्याचा तात्काळ परिणाम होईलच असे नाही. राज्यातील काही भागांत पुढील काही दिवस पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. Maharashtra Rain News
त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढील काही दिवसांचे स्थानिक हवामान आणि पावसाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे करणे महत्त्वाचे ठरणार आहे. मॉन्सूनची माघार जसजशी पुढे सरकेल, तसतसा राज्यातील पावसाचा पॅटर्न बदलण्याची शक्यता आहे.

नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .








