मुंबई : PM Awas Yojana Update प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत आवास प्लस २०२४च्या सर्वेक्षणात ज्या लाभार्थ्यांची नावे समाविष्ट आहेत, त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या लाभार्थ्यांना आता हमीपत्र सादर करावे लागणार आहे.
आवास प्लस २०२४च्या सर्वेक्षणात नाव समाविष्ट झालेल्या लाभार्थ्यांनी संबंधित ग्रामपंचायतीशी संपर्क साधून हमीपत्राची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या नमुन्यानुसार हमीपत्र भरावे लागणार आहे.
हमीपत्रामध्ये लाभार्थ्याचे नाव, ग्रामपंचायत, तालुका, जिल्हा, Registration Number आणि Beneficiary ID यासारखी माहिती भरावी लागेल. त्यानंतर लाभार्थ्याचा मोबाईल क्रमांक तसेच सही किंवा अंगठ्याचा ठसा करावा लागणार आहे.
हमीपत्रासोबत आवश्यक कागदपत्रेही जोडावी लागणार आहेत. यामध्ये आधार कार्ड, बँक पासबुक आणि रेशन कार्डच्या प्रती देण्याची माहिती आहे. PM Awas Yojana Update
त्यामुळे आवास प्लस २०२४च्या सर्वेक्षणात आपले नाव समाविष्ट असलेल्या लाभार्थ्यांनी आपल्या ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधून हमीपत्राबाबतची पुढील प्रक्रिया जाणून घ्यावी.
दरम्यान, घरकुल योजनेशी संबंधित नवीन माहिती किंवा शासनाकडून पुढील सूचना प्राप्त झाल्यास त्याबाबतची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवली जाईल.

नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .