HRA संदर्भात महत्त्वाची बातमी; 17 जिल्ह्यांतील शिक्षक-कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्त्याचा फरक मिळणार. House Rent Allowance,
मुंबई : House Rent Allowance : राज्यातील अनुदानित खासगी प्राथमिक शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी घरभाडे भत्ता म्हणजेच HRA संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने 11 ऑगस्ट 2026 रोजी यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे.
या परिपत्रकानुसार, जुलै 2021 ते सप्टेंबर 2021 या कालावधीतील घरभाडे भत्ता फरकाची रक्कम काही जिल्ह्यांतील कर्मचाऱ्यांना यापूर्वीच अदा करण्यात आली आहे. त्यामुळे त्या जिल्ह्यांना पुन्हा फरकाची रक्कम देय राहणार नाही.
17 जिल्ह्यांमध्ये यापूर्वीच HRA फरक अदा
गडचिरोली, वर्धा, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, बीड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, नंदुरबार, अहिल्यानगर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या 17 जिल्ह्यांतील संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता फरकाची रक्कम अदा करण्यात आल्याचे परिपत्रकात नमूद आहे. House Rent Allowance :
आणखी 17 जिल्ह्यांतील कर्मचाऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार
दरम्यान, ज्या 17 जिल्ह्यांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना हा फरक अद्याप अदा करण्यात आलेला नाही, त्यांना ऑगस्ट पेड इन सप्टेंबर 2026 च्या वेतन देयकासोबत फरकाची रक्कम देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
यामध्ये ठाणे, नाशिक, रायगड, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, धाराशिव, लातूर, यवतमाळ, गोंदिया, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, पालघर आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे.
त्यामुळे या जिल्ह्यांतील संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सप्टेंबर 2026 मध्ये मिळणाऱ्या वेतन देयकाकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरणार आहे. घरभाडे भत्ता फरकाची रक्कम वेतनासोबत जमा होण्याची शक्यता असून, त्याबाबत संबंधित शाळा प्रशासन आणि वेतन देयकाची माहिती तपासता येईल. House Rent Allowance :
टीप : वरील माहिती उपलब्ध परिपत्रकाच्या आधारे देण्यात आली आहे. प्रत्यक्ष रक्कम आणि पात्रता संबंधित वेतन नोंदी व विभागीय आदेशानुसार निश्चित होईल.

नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .