रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी! राज्यात ४३ लाखांहून अधिक रेशन कार्ड संशयित; ९.८० लाख प्रकरणांवर कारवाई

Irfan Shaikh ✅

रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी! राज्यात ४३ लाखांहून अधिक रेशन कार्ड संशयित; ९.८० लाख प्रकरणांवर कारवाई.

मुंबई : Ration Card Update: राज्यातील रेशन वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी सुरू असलेल्या मिशन सुधार’ मोहिमेत मोठी माहिती समोर आली आहे. रेशन कार्डधारकांची माहिती विविध सरकारी यंत्रणांच्या डेटाशी पडताळून पाहिल्यानंतर राज्यात तब्बल ४३ लाख ३३ हजार ३०३ संशयित रेशन कार्ड प्रकरणे आढळून आली आहेत.

यापैकी ९ लाख ८० हजार ३६ प्रकरणांवर कारवाई करण्यात आली असून, तब्बल ७७ लाख २२ हजार ४१८ लाभार्थी सदस्यांवर त्याचा परिणाम झाला आहे. उर्वरित प्रकरणांची पडताळणी सध्या जिल्हा आणि तालुका पातळीवर सुरू आहे.

कोणती रेशन कार्डे संशयित?

‘मिशन सुधार’ अंतर्गत रेशन कार्डधारकांची माहिती विविध सरकारी यंत्रणांकडील उपलब्ध माहितीशी तपासली जात आहे. या प्रक्रियेत उच्च उत्पन्न असलेले लाभार्थी, दुबार नावे, निष्क्रिय रेशन कार्ड, कंपन्यांचे संचालक, १०० वर्षांपेक्षा अधिक वयाचे लाभार्थी आणि चारचाकी वाहनधारक अशा विविध श्रेणीतील प्रकरणे तपासण्यात आली.

हे ही वाचा 👉🏻  वाढीव पेन्शन मिळविण्यासाठी आता 80 वर्षांची आवश्यकता नाही, पेन्शन 65 वर्षांपासूनच मिळेल, जाणून घ्या संपूर्ण माहिती. Pensioners pension age limit update

उपलब्ध आकडेवारीनुसार, उच्च उत्पन्न असलेले २२.७० लाख, दुबार नाव असलेले १०.४३ लाख, निष्क्रिय रेशन कार्डधारक ४.१९ लाख, कंपन्यांचे संचालक १.५७ लाख, १०० वर्षांपेक्षा जास्त वयाचे ७३ हजार ४०० आणि चारचाकी वाहनधारक ९ हजार ९८ प्रकरणे संशयित श्रेणीत आढळली आहेत.

३३.५३ लाख प्रकरणांची पडताळणी सुरू

एकूण ४३.३३ लाख संशयित प्रकरणांपैकी ९.८० लाख प्रकरणांवर कार्यवाही झाली आहे. तर तब्बल ३३.५३ लाख प्रकरणांची अद्याप पडताळणी सुरू आहे. पुणे, नाशिक, अहिल्यानगर, कोल्हापूर आणि जळगाव यांसह काही जिल्ह्यांमध्ये संशयित लाभार्थ्यांची संख्या अधिक असल्याचे समोर आले आहे.

हे ही वाचा 👉🏻  सरकारने २.५ कोटी आधार कार्ड केले निष्क्रिय. येथे तपासा. Aadhar card deactivate

आधार सीडिंग आणि ई-केवायसीकडे लक्ष द्या

रेशन कार्डधारकांनी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती अद्ययावत आहे का, हे तपासणे महत्त्वाचे आहे. आधार सीडिंग, ई-केवायसी आणि रेशन कार्डवरील सदस्यांची माहिती योग्य असल्याची खात्री करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

दीर्घकाळ रेशन न घेणे, आधार सीडिंग न करणे किंवा रेशन कार्डमधील माहिती अद्ययावत नसणे यामुळेही लाभार्थ्यांच्या नोंदीवर परिणाम होऊ शकतो.

अपात्र ठरल्यास लाभ बंद होऊ शकतो. Ration Card Update,

तपासणीत एखादा लाभार्थी योजनेच्या निकषात बसत नसल्याचे स्पष्ट झाल्यास त्याचे रेशन कार्ड किंवा संबंधित सदस्याचे नाव वगळले जाऊ शकते. चुकीची माहिती देऊन रेशनचा लाभ घेतल्याचे आढळल्यास लाभाची वसुली तसेच नियमानुसार पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा 👉🏻  2025 च्या नवीन ट्राफिक नियमामुळे, वाढले टेन्शन, जाणुन घ्या संपूर्ण माहिती. Traffic new rules 

त्यामुळे रेशन कार्डधारकांनी घाबरून जाण्याऐवजी आपल्या रेशन कार्डवरील माहिती, आधार लिंकिंग आणि ई-केवायसीची स्थिती तपासून घेणे महत्त्वाचे आहे. पात्र लाभार्थ्यांपर्यंतच स्वस्त धान्याचा लाभ पोहोचवणे हा ‘मिशन सुधार’ मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.

Pages

Follow:
नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *