Close Visit MahaNews12

पाटोदा आगाराचे अभिमान, महादेव जाधव यांचा नातू यशराज गपाट ची महाराष्ट्र रग्बी संघाच्या कर्णधारपदी निवड

पाटोदा आगाराचा अभिमान! महादेव जाधव यांचा नातू यशराज गपाट महाराष्ट्र रग्बी संघाचा कर्णधार. 

पाटोदाMaharashtra Rugby Team :  पाटोदा आगारातील इलेक्ट्रिशियन महादेव जाधव यांचा नातू यशराज गपाट याची अंडर 16 रग्बी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी निवड झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी करत यशराजने राज्यस्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली असून आता महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे.

यशराज गपाट हा लहानपणापासूनच क्रीडाप्रेमी असून रग्बी या खेळात त्याने सातत्यपूर्ण सराव, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर उल्लेखनीय प्रगती साधली आहे. जिल्हा व विभागीय स्तरावरील स्पर्धांमध्ये त्याने उत्कृष्ट खेळ करत निवड समितीचे लक्ष वेधून घेतले होते. त्याच्या नेतृत्वगुणांमुळे आणि मैदानावरील चपळ खेळामुळे त्याची कर्णधारपदी निवड झाल्याचे क्रीडा जाणकारांनी सांगितले.

यशराजच्या या यशामुळे पाटोदा आगारातील कर्मचाऱ्यांसह मित्रपरिवार व नातेवाईकांमध्ये अभिमानाची भावना निर्माण झाली आहे. सहकाऱ्यांनी त्याचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. “आमच्या आगारातील कर्मचाऱ्यांचा नातू राज्य संघाचा कर्णधार होणे ही आमच्यासाठी गौरवाची बाब आहे,” अशा शब्दांत अनेकांनी आनंद व्यक्त केला.

सर्व स्तरातून यशराजवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्याच्या पुढील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याच्या यशामुळे परिसरातील इतर विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्यास प्रेरणा मिळत आहे.

 उल्लेखनीय यशामुळे यशराज गपाट याचे नाव राज्यभर उज्ज्वल झाले असून भविष्यात तो आणखी मोठी कामगिरी करेल, असा विश्वास क्रीडाप्रेमींनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment