होळीपूर्वी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार ? जानेवारी 2026 पासून डीएमध्ये 2% वाढीची शक्यता. DA Allowance News

Irfan Shaikh ✅
2 Min Read

होळीपूर्वी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार ? जानेवारी 2026 पासून डीएमध्ये 2% वाढीची शक्यता. DA Allowance News

नवी दिल्ली : DA Allowance News  :  केंद्र सरकारचे लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारक सध्या आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची वाट पाहत आहेत. मात्र, त्याआधीच महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलत (DR) वाढीबाबत सकारात्मक संकेत मिळत आहेत. जानेवारी 2026 पासून डीएत 2 टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कामगार ब्युरोने डिसेंबर 2025 साठीचा AICPI-IW निर्देशांक जाहीर केला आहे. या निर्देशांकाच्या आधारे केंद्र सरकार डीए वाढीचा निर्णय घेत असते. उपलब्ध आकडेवारीनुसार, जानेवारीपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 2 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय सरकारच्या अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होणार आहे.

हे ही वाचा 👉🏻  एसटी बसेसमध्ये सवलतीचा लाभ घेण्यासाठी आता हे कार्ड अनिवार्य, अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. Msrtc Ncmc News

हे ही वाचा…..

पेन्शन हा कायदेशीर हक्कच; केंद्र सरकारला मुंबई हायकोर्टाचा दणका. 

कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची संधी; तुमचं मत थेट आयोगापर्यंत पोहोचणार. 8th Pay Commission 

मार्चमध्ये अधिकृत घोषणा होण्याची शक्यता. DA Allowance News

केंद्र सरकारकडून सामान्यतः जानेवारीपासून लागू होणाऱ्या डीए वाढीची घोषणा मार्च महिन्यात केली जाते. त्यामुळे यंदाही होळीपूर्वी डीए वाढीची घोषणा होण्याची शक्यता आहे. अशी घोषणा झाल्यास सणासुदीच्या काळात कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

कर्मचाऱ्यांसह पेन्शनर्सनाही लाभ

31 डिसेंबर 2025 रोजी सातव्या वेतन आयोगाचा कालावधी संपुष्टात आला आहे. आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी अद्याप लागू झालेल्या नसल्याने सध्या डीएची गणना सातव्या वेतन आयोगाच्या मूळ वेतनाच्या आधारेच केली जात आहे. डीए वाढल्यास त्याचा थेट फायदा पगारवाढीच्या स्वरूपात कर्मचाऱ्यांना मिळेल, तर पेन्शनधारकांना महागाई सवलत (DR) वाढवून दिली जाईल.

हे ही वाचा 👉🏻  नोकरी गेल्यानंतरही तुम्हाला मिळू शकतो दिलासा, जाणून घ्या संपूर्ण माहिती. Credit Card Insurance Benefits

डीए वाढ कशी ठरते? DA Allowance News

महागाई भत्ता ठरवण्यासाठी सरकार AICPI-IW च्या 12 महिन्यांच्या सरासरीचा आधार घेतो. या निर्देशांकात झालेल्या वाढ-घटीनुसार डीए वाढवण्याचा निर्णय घेतला जातो. केंद्र सरकार दरवर्षी जानेवारी आणि जुलै अशा दोन टप्प्यांत डीएत सुधारणा करते.

https://employeesindia.in/2026/02/08/ladaki-bahin-yojana-scheme/

अधिकृत निर्णयाची प्रतीक्षा

सध्या डीएत 2 टक्के वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी याबाबतचा अंतिम निर्णय केंद्र सरकारच्या अधिकृत घोषणेनंतरच निश्चित होईल. त्यामुळे लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष आता सरकारच्या पुढील घोषणेकडे लागले आहे. DA Allowance News

 

Follow:
नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *