कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची संधी; तुमचं मत थेट आयोगापर्यंत पोहोचणार. 8th Pay Commission 

कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची संधी; तुमचं मत थेट आयोगापर्यंत पोहोचणार. 8th Pay Commission 

नवी दिल्ली : 8th Pay Commission 
केंद्र सरकारने ८ व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या कामाला गती देण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. आयोगाची अधिकृत वेबसाईट 8cpc.gov.in सुरू करण्यात आली असून, यामार्फत कर्मचारी आणि पेन्शनधारकांकडून थेट सूचना व अपेक्षा मागवण्यात येणार आहेत.

यामागचा उद्देश स्पष्ट आहे — वेतन आयोगाचा निर्णय फक्त कागदावरच्या आकड्यांवर न घेता, प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन घ्यावा.

हे ही वाचा 👇🏻  1 तारखे पासून ATM मधून पैसे काढणे पडेल महागात, नवीन नियम आणि शुल्क जाणून घ्या.ATM money withdrawal rules 2025

कर्मचाऱ्यांना आपलं मत मांडण्याची थेट संधी. 8th Pay Commission 

८ व्या वेतन आयोगासाठी MyGov पोर्टलवर १८ प्रश्नांची प्रश्नावली देण्यात आली आहे.
या प्रश्नावलीत वेतन, पेन्शन, भत्ते, फिटमेंट फॅक्टर अशा अनेक मुद्द्यांवर प्रश्न विचारण्यात आले आहेत.

कर्मचारी, पेन्शनधारक किंवा संबंधित घटकांनी ही प्रश्नावली भरून आपलं मत नोंदवायचं आहे.


कोण कोण सहभागी होऊ शकतात?

ही प्रश्नावली खालील सर्वांसाठी खुली आहे —

  • केंद्र सरकारची मंत्रालये आणि विभाग
  • केंद्र व केंद्रशासित प्रदेशातील कर्मचारी
  • न्यायालयीन व विधी विभागातील कर्मचारी
  • नियामक संस्थांमधील अधिकारी व कर्मचारी
  • सेवेत असलेले व निवृत्त कर्मचाऱ्यांच्या संघटना
  • पेन्शनधारक
  • संशोधक, अभ्यासक
  • सर्वसामान्य नागरिक
हे ही वाचा 👇🏻  एसटीतून गणपती उत्सवासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना मोठी दिलासा – १५% सूट मिळणार! Msrtc Reservation

ओळख पूर्णपणे गोपनीय राहणार

आयोगाने स्पष्ट केले आहे की, प्रश्नावली भरणाऱ्याची ओळख उघड केली जाणार नाही.
सर्व उत्तरांचा एकत्रित अभ्यास केला जाईल. कोणाचंही नाव, पद किंवा संस्था सार्वजनिक केली जाणार नाही.
यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारक कोणत्याही भीतीशिवाय आपलं मत मोकळेपणाने मांडू शकतील.


शेवटची तारीख लक्षात ठेवा

८ व्या वेतन आयोगासाठी सूचना पाठवण्याची अंतिम तारीख १६ मार्च २०२६ आहे.

महत्त्वाचं म्हणजे —

  • फक्त MyGov पोर्टलवरूनच सूचना स्वीकारल्या जाणार
  • ई-मेल, पत्र किंवा PDF स्वरूपातील अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत

संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि पारदर्शक ठेवण्यात आली आहे.


८ वा वेतन आयोग का महत्त्वाचा आहे? 8th Pay Commission 

हा वेतन आयोग कोट्यवधी केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या भविष्याशी जोडलेला आहे.
यामध्ये वेतन रचना, भत्ते, पेन्शन यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा 👇🏻  केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी बातमी, महागाई भत्ता जर बेसिक पगारामध्ये विलिन झाला तर इतका वाढेल पगार जाणून घ्या संपूर्ण माहिती. Central employees Da update

तसंच या निर्णयांचा देशाच्या आर्थिक स्थितीवरही परिणाम होणार असल्याने आयोगाकडून संतुलित निर्णय घेण्यावर भर दिला जात आहे.


फिटमेंट फॅक्टरवर विशेष चर्चा. 8th Pay Commission 

प्रश्नावलीमध्ये फिटमेंट फॅक्टर कसा ठरवावा, वेगवेगळ्या पदांसाठी वेतन कसं असावं,
कामगिरीवर आधारित वेतन प्रणाली आणि वार्षिक वाढीबाबतही मते मागवण्यात आली आहेत.

Leave a Comment