जिल्हा परिषद निवडणूक 2026 : 7 फेब्रुवारीला या कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी मिळणार. Zilla Parishad Election

मुंबई : Zilla Parishad Election 2026   राज्यातील १२ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत १२५ पंचायत समित्यांसाठी शनिवार, दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कामगार व कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी देणे बंधनकारक असल्याचे परिपत्रक उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने जारी केले आहे.

निवडणूक होणाऱ्या क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी व कर्मचारी तसेच कामानिमित्त निवडणूक क्षेत्राबाहेर कार्यरत असलेल्या मतदारांनाही मतदानासाठी भरपगारी सुट्टी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे आदेश उद्योग, कारखाने, दुकाने, खासगी कंपन्या, आयटी कंपन्या, शॉपिंग मॉल्स, रिटेल आस्थापना, हॉटेल्स, खाद्यगृहे, नाट्यगृहे व इतर सर्व आस्थापनांना लागू राहणार आहेत.

हे ही वाचा 👇🏻  ड्रायव्हर्ससाठी चांगली बातमीः सरकार आणत आहे fastag paas आता वर्षभर 3 हजार रुपयात प्रवास करता येणार. fastag paas 

पूर्ण सुट्टी शक्य नसेल तर विशेष सवलत. Zilla Parishad Election 2026

अपवादात्मक परिस्थितीत, जिथे कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे किंवा अत्यावश्यक व लोकोपयोगी सेवा सुरू ठेवणे आवश्यक आहे, अशा ठिकाणी पूर्ण दिवसाची सुट्टी देणे शक्य नसेल. मात्र, अशा वेळी संबंधित कर्मचाऱ्यांना मतदानासाठी २ ते ३ तासांची विशेष सवलत देणे बंधनकारक राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

सार्वजनिक सुट्टी लागू असलेले जिल्हे

या निवडणुकीसाठी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशीव आणि लातूर या १२ जिल्ह्यांतील पंचायत समित्यांमध्ये सार्वजनिक सुट्टी लागू राहणार आहे.

हे ही वाचा 👇🏻  वडिलोपार्जित जमिनीचे वाटणीपत्र कसे करावे? खर्च किती? नोंदणी आवश्यक आहे का? सविस्तर मार्गदर्शन. Land Record 

राज्य शासनाच्या या निर्णयामुळे खासगी व सार्वजनिक क्षेत्रातील लाखो कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावणे सुलभ होणार असून, लोकशाही प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात सहभाग वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. Zilla Parishad Election 2026

Leave a Comment