एसटी महामंडळाचा महत्त्वाचा आदेश; जुलै 2026 मधील रिक्त पदांची माहिती मागवली, महाभरती येणार हे नक्की 

Irfan Shaikh ✅

एसटी महामंडळाचा महत्त्वाचा आदेश; जुलै 2026 मधील रिक्त पदांची माहिती मागवली, महाभरती येणार हे नक्की 

मुंबई | प्रतिनिधी

MSRTC Bharti 2026 :  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) जुलै 2026 मधील विविध रिक्त पदांची माहिती तातडीने सादर करण्याचे आदेश सर्व विभागीय कार्यालयांना दिले आहेत. याबाबत कर्मचारीवर्ग अधिकारी कार्यालयातून दि. 06 जुलै 2026 रोजी पत्र जारी करण्यात आले आहे.

महामंडळाच्या पत्रानुसार, सर्व विभागीय नियंत्रकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील वर्ग-3 आणि वर्ग-4 संवर्गातील रिक्त पदांची अद्ययावत माहिती निर्धारित नमुन्यात सादर करायची आहे. ही माहिती दि. 09 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत ई-मेलद्वारे पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा 👉🏻  सरकारी कर्मचाऱ्यांच्या 18 महिन्यांच्या थकीत महागाई भत्या बाबत नवीन अपडेट जाणून घ्या. Da hike update August

कोणत्या पदांची माहिती मागवली?

महामंडळाने चालक, वाहक, चालक तथा वाहक, शिपाई, लिपिक-टंकलेखक, सहाय्यक तसेच इतर वर्ग-3 आणि वर्ग-4 संवर्गातील पदांची रिक्त स्थिती मागवली आहे. प्रत्येक विभागाने मंजूर पदे, कार्यरत कर्मचारी, रिक्त पदे, भरतीसाठी उपलब्ध जागा तसेच इतर आवश्यक तपशील नमूद करायचे आहेत.

सर्व विभागांना सूचना

हे पत्र पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, अमरावती, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, बुलढाणा, वर्धा आदी विभागांसह सर्व विभागीय कार्यालयांना पाठविण्यात आले आहे.

भरती प्रक्रियेसाठी महत्त्वाचे पाऊल?

महामंडळाकडून रिक्त पदांचा आढावा घेण्यासाठी ही माहिती मागविण्यात आल्याने भविष्यातील भरती प्रक्रिया, पदभरतीचे नियोजन आणि मनुष्यबळ व्यवस्थापनासाठी हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे. मात्र, या पत्रात भरती जाहीर करण्यात आलेली नसून केवळ रिक्त पदांची माहिती संकलित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, याचा अर्थ लवकरच जितक्या रिक्त जागा आहे तितक्या पदांची भरती पुढील एक महिन्यात येणार आहे हे मात्र नक्की.

Pages

Follow:
नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *