एसटी कर्मचाऱ्यांचा विजयी मेळावा उत्साहात संपन्न; राज्य सरकारी कर्मचाऱ्यांइतके वेतन मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार कर्मचाऱ्यांचा निर्धार. 

Irfan Shaikh ✅

बीड प्रतिनिधी : Maharashtra Transport News : मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने बीड विभागात एसटी कर्मचाऱ्यांचा विजयी मेळावा व संकल्प सभा उत्साहात पार पडली. यावेळी संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संदीप शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना संबोधित करताना, “जोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांइतके होत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही,” असा ठाम निर्धार व्यक्त केला.

कार्यक्रमात संघटनेचे केंद्रीय जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांची उपस्थिती होती बीड विभागीय सचिव गणेश बापू चव्हाण यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते . या प्रसंगी ज्ञानेश्वर चातुर, विलास आजले, विजय कुडके, श्रीकांत येडे पाटील, मनोज डावकर, वल्लभ चिरके, रमेश गित्ते, दिलीप लव्हारे, विष्णू बांगर, गोरक्ष चौधरी, सचिन दुधाळ, महेश लोंढे, रंजित राऊत, सोबतच जिल्ह्यातील सर्व आगारातील अध्यक्ष, सचिव यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

हे ही वाचा 👉🏻  EPFO कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी, आता दरमहा आपल्याला इतकी पेन्शन मिळेल, संपूर्ण तपशील जाणून घ्या.Employees update

मेळाव्यात मान्यवरांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर मार्गदर्शन करत संघटनेच्या लढ्याचा आढावा घेतला. नुकत्याच मिळालेल्या महत्त्वाच्या यशाबाबत माहिती देताना 5 च्या पटीत वेतनवाढ, इन्क्रिमेंटची टक्केवारी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे लागू करण्याचा निर्णय, तसेच घरभाडे भत्ता (HRA) आणि महागाई भत्ता (DA) जुलै महिन्याच्या वेतनात देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत करत हा एसटी कर्मचाऱ्यांच्या एकजुटीचा आणि संघटनेच्या सातत्यपूर्ण लढ्याचा मोठा विजय असल्याची भावना व्यक्त केली.

मेळाव्याच्या शेवटी एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाशी समकक्ष करण्यासाठी भविष्यातही तीव्र लढा सुरू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना एकजूट कायम ठेवून हक्कांसाठी संघर्ष सुरू ठेवण्याचे आवाहन केले.

Pages

Follow:
नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *