मुंबई : Maharashtra Government Order : जिल्हा परिषद शाळांच्या परिसरातील स्वच्छता आणि स्वच्छतागृहांच्या देखभालीबाबत राज्याच्या ग्रामविकास विभागाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. ५ हजार किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या हद्दीतील जिल्हा परिषद शाळांमधील स्वच्छतागृहांची स्वच्छता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
ग्रामविकास विभागाने यासंदर्भात ४ मार्च २०२६ रोजी सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. शाळांमध्ये परिसर आणि स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेसाठी स्वतंत्र कर्मचारी उपलब्ध नसल्याची बाब यामध्ये नमूद करण्यात आली आहे.
ग्रामपंचायतीकडे जबाबदारी
शाळांच्या स्वच्छतेसंदर्भात झालेल्या बैठकीमध्ये ग्रामपंचायतीमार्फत स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारल्यास शाळांचा परिसर आणि स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवणे शक्य होईल, अशी भूमिका मांडण्यात आली होती.
यानंतर ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या मंत्र्यांनी ५ हजार किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमधील जिल्हा परिषद शाळांच्या स्वच्छतागृहांची स्वच्छता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी करावी, असे निर्देश दिले आहेत. त्यानुसार संबंधित स्तरावर आवश्यक कार्यवाही करण्यास सांगण्यात आले आहे.
या निर्णयामुळे संबंधित ग्रामपंचायतींच्या हद्दीत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळांमधील स्वच्छतागृहांच्या नियमित स्वच्छतेची जबाबदारी कोणाकडे असेल, याबाबत स्पष्टता निर्माण झाली आहे.
हा आदेश विशेषतः ५ हजार किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींमधील जिल्हा परिषद शाळांना लागू असल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.


नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .








