नवी दिल्ली : EPS 95 Pension News : EPS-95 पेन्शनधारकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राष्ट्रीय संघर्ष समिती (NAC)कडून केंद्र सरकार आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) पातळीवर पाठपुरावा सुरू आहे. आगामी केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या (CBT) बैठकीच्या पार्श्वभूमीवर NACच्या तीन सदस्यीय केंद्रीय पथकाने दिल्ली दौरा करून विविध CBT सदस्य आणि कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

NACच्या माहितीनुसार, 28 सप्टेंबर रोजी प्रतिनिधी मंडळाने CBT सदस्य तसेच पेंशन आणि HR उपसमितीतील सदस्यांची भेट घेऊन EPS-95 पेन्शनधारकांच्या मागण्यांबाबत निवेदने आणि महत्त्वाची कागदपत्रे सादर केली. किमान पेन्शन 7,500 रुपये अधिक महागाई भत्ता (DA) करणे, पेन्शन गणनेच्या सूत्रात बदल, सरकारचा अंशदान वाढवणे, उच्च पेन्शनसाठी नाकारलेली प्रकरणे मंजूर करणे, पुन्हा संधी देण्यासाठी विंडो सुरू करणे आणि EPFची वेतन मर्यादा हटवणे, अशा मागण्यांचा यात समावेश आहे.
CBTच्या पेंशन उपसमितीचे सदस्य आर. कारूमलाईयन यांच्याशी झालेल्या चर्चेत आगामी CBT बैठकीपूर्वी पेंशन उपसमितीची बैठक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. EPS-95 पेन्शनधारकांच्या हितासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी दिल्याचे NACने म्हटले आहे. EPS 95 Pension News
तसेच HR उपसमितीचे सदस्य आणि HMSचे महासचिव हरभजन सिंह सिद्धू यांच्याशीही सविस्तर चर्चा झाली. पेंशनवाढीचा मुद्दा समितीत मांडून तो CBTच्या अजेंड्यावर आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याचा दावा NACने केला.
30 सप्टेंबर रोजी BMSच्या दिल्लीतील मुख्यालयातही पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून CBT सदस्यांच्या नावाने निवेदने आणि कागदपत्रे देण्यात आली. दरम्यान, EPFOच्या 30 सप्टेंबरच्या पत्रानुसार CBTची आगामी बैठक 19 नोव्हेंबर 2026 रोजी गुजरातमधील गीर येथे होणार असल्याचे NACने सांगितले आहे. EPS 95 Pension News
NACच्या केंद्रीय पथकात राष्ट्रीय महासचिव वीरेंद्र सिंह राजावत, राष्ट्रीय सचिव रमेश बहुगुणा आणि दिल्ली प्रदेशाध्यक्ष बी. एस. राणा यांचा समावेश होता.

नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .







