Close Visit MahaNews12

राज्य कर्मचाऱ्यांचा DA 60% वर; वाढीव भत्ता आणि थकबाकी मिळाली, एसटी कर्मचारी मात्र अजूनही प्रतीक्षेत

मुंबई :  Employee Salary Increase :  महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्याबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2 टक्क्यांनी वाढ केली असून, DA आता 60 टक्क्यांवर पोहोचला आहे. ही वाढ 1 जानेवारी 2026 पासून लागू करण्यात आली आहे.

यापूर्वी कर्मचाऱ्यांना 58 टक्के दराने महागाई भत्ता मिळत होता. आता वाढीव दरानुसार कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचा लाभ मिळाला आहे. तसेच जानेवारी 2026 पासून लागू झालेल्या वाढीमुळे मागील कालावधीची DA थकबाकीची रक्कमही कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे.

एसटी कर्मचारी अजूनही प्रतीक्षेत. Employee Salary Increase

राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ मिळाली असली, तरी एसटी कर्मचाऱ्यांना मात्र अद्याप ही वाढ लागू करण्यात आलेली नाही. मागील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपादरम्यान सरकारकडून राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू होताच एसटी कर्मचाऱ्यांनाही तो लागू करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, अद्याप एसटी कर्मचाऱ्यांसाठी याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे वाढीव महागाई भत्त्याच्या निर्णयाची एसटी कर्मचारी अजूनही प्रतीक्षा करत आहेत. Employee Salary Increase

Leave a Comment