मतदारांनी लक्ष द्या! SIR प्रक्रियेत दावे-हरकती दाखल करण्याची मुदत वाढली

मुंबई :  SIR Voter List Maharashtra : महाराष्ट्रातील मतदारांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण अर्थात SIR प्रक्रियेत दावे आणि हरकती दाखल करण्याची मुदत निवडणूक आयोगाने वाढवली आहे. आता नागरिकांना 12 ऑक्टोबर 2026 पर्यंत दावे किंवा हरकती दाखल करता येणार आहेत. यापूर्वी ही मुदत 30 सप्टेंबरपर्यंत होती.

निवडणूक आयोगाच्या 26 सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत महाराष्ट्रासाठी सुधारित वेळापत्रक निश्चित करण्यात आले. त्यानुसार दावे, हरकती आणि नोटिसांवरील निर्णयाची प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत 10 नोव्हेंबर 2026 करण्यात आली आहे. त्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया पुढे जाईल.

मतदारांना काय करता येणार? SIR Voter List Maharashtra

SIR प्रक्रियेदरम्यान एखाद्या मतदाराचे नाव प्रारूप मतदार यादीत दिसत नसेल किंवा मतदार यादीतील नोंदीबाबत आक्षेप असल्यास, संबंधित प्रक्रियेत दावा किंवा हरकत दाखल करण्याची संधी उपलब्ध आहे. त्यामुळे ज्या नागरिकांना आपल्या मतदार नोंदीबाबत दुरुस्ती किंवा नावाच्या समावेशाची आवश्यकता आहे, त्यांनी वाढीव मुदतीचा उपयोग करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नोटीस मिळालेल्या मतदारांसाठीही दिलासा. SIR Voter List Maharashtra

SIR प्रक्रियेत ‘अनमॅप्ड’ किंवा तार्किक विसंगती आढळल्यामुळे नोटीस बजावण्यात आलेल्या काही मतदारांच्या बाबतीत निवडणूक आयोगाने प्रक्रिया सुलभ करण्याचे निर्देश दिले आहेत. अशा मतदारांच्या घरी BLO अर्थात बूथस्तरीय अधिकारी भेट देऊन आवश्यक कागदपत्रे गोळा करतील. ही कागदपत्रे ऑनलाइन प्रणालीवर अपलोड करून पुढील निर्णयासाठी निवडणूक नोंदणी अधिकाऱ्याकडे पाठवली जातील.

अशा प्रकरणांमध्ये प्रत्येक मतदाराला निवडणूक नोंदणी अधिकाऱ्याच्या कार्यालयात प्रत्यक्ष सुनावणीसाठी बोलावणे आवश्यक राहणार नाही. विशेष परिस्थितीत सुनावणीची गरज भासल्यास ती शक्यतो ऑनलाइन घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नाव वगळले गेले तरी संधी कायम. SIR Voter List Maharashtra

SIR प्रक्रियेदरम्यान किंवा त्यानंतर मतदार यादीतून नाव वगळले गेले असल्यास, संबंधित व्यक्तीला सातत्यपूर्ण मतदार नोंदणी प्रक्रियेद्वारे नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करता येणार आहे. नवमतदार आणि प्रथमच मतदान करणाऱ्या तरुणांनाही या प्रक्रियेतून मतदार यादीत नाव नोंदवता येईल.

त्यामुळे महाराष्ट्रातील मतदारांनी आपल्या नावाची प्रारूप मतदार यादीतील नोंद तपासून पाहावी आणि काही त्रुटी असल्यास 12 ऑक्टोबर 2026 पूर्वी आवश्यक दावा किंवा हरकत दाखल करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment