आता या कार्ड शिवाय एसटी मध्ये प्रवास करता येणार नाही, ‘NCMC’ कार्ड होणार अनिवार्य, रोखविरहित प्रवासाला गती. MSRTC NCMC Card.

Irfan Shaikh ✅
2 Min Read

मुंबई | प्रतिनिधी : 

MSRTC NCMC Card (एसटी) प्रवासात मोठा डिजिटल बदल होणार आहे. प्रवाशांना अधिक पारदर्शक आणि सोयीस्कर सेवा देण्यासाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, हा निर्णय प्रवास व्यवस्थेला डिजिटल बळ देणारा ठरणार आहे.


सवलतींसाठी NCMC कार्ड अनिवार्य

(NCMC) प्रणालीमुळे प्रवाशांना रोखविरहित व्यवहार करता येणार असून सवलतींची अचूक नोंद आणि पारदर्शक प्रतिपूर्ती शक्य होणार आहे. विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी हे कार्ड अनिवार्य असणार आहे. त्यामुळे गैरप्रकारांना आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

हे ही वाचा 👇🏻  EPFO सदस्यांसाठी आनंदाची बातमी? होळी च्या पाईश्वभूमीवर मिळणार व्याज. EPFO interest rate 2026

करार दोन प्रमुख संस्थांशी

या प्रकल्पासाठी एसटी महामंडळाने

यांच्याशी करार केला आहे.

राज्यातील सर्व आगारांमध्ये लवकरच नोंदणी मोहीम सुरू करण्यात येणार आहे. बसस्थानकांवरच नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येणार असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठी सोय होणार आहे.


कोणाला कसे मिळणार कार्ड?

MSRTC NCMC Card.

  • विद्यार्थी: ‘सरल’ क्रमांकाशी जोडलेले कार्ड
  • अमृत व सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक, महिला: आधार संलग्न कार्ड
  • दिव्यांग प्रवासी: UDID क्रमांकाशी जोडलेले विशेष कार्ड
  • स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार व राज्यस्तरीय पुरस्कार विजेते: विभागीय कार्यालयामार्फत वितरण

किंमत व रिचार्ज सुविधा.

MSRTC NCMC Card.

  • नवीन कार्ड किंमत: ₹199 (GST सह)
  • जुने स्मार्ट कार्ड जमा केल्यास: ₹149
  • किमान रिचार्ज: ₹100 (५० रुपयांच्या पटीत)
हे ही वाचा 👇🏻  निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेणार,, राज्य सरकारचा नवीन शासन निर्णय जारी. Employees new GR 

रिचार्जसाठी ईटीआयएम मशीन, अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल ॲप व नियुक्त एजंटमार्फत सुविधा उपलब्ध असेल. ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या सोयीसाठी 3000 हून अधिक अधिकृत एजंट नियुक्त करण्यात आले आहेत.


डिजिटल पारदर्शकतेकडे महत्त्वाचे पाऊल

एसटीचा हा निर्णय पारंपरिक प्रवास व्यवस्थेला डिजिटल स्पर्श देणारा टप्पा मानला जात आहे. एका स्मार्ट कार्डमुळे प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक होईल, असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.

राज्यातील प्रवाशांसाठी हा बदल आगामी काळात अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

Follow:
नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *