महाराष्ट्राच्या लाडकी बहीण योजनेचे मोठे अपडेट, राज्य सरकार आता ITR डेटा मागविणार याच्या मदतीने फसवणूक पकडणार. Ladaki Bahin Yojana 2025 

By Khushi

Ladaki Bahin Yojana 2025 :नमस्कार मित्रानो महाराष्ट्र सरकारची प्रमुख महिला कल्याण योजना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना’ मध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि होणारी फसवणूक रोखण्यासाठी सरकारमार्फत एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.

राज्य सरकार आता आयकर रिटर्न (ITR)विभागाकडून डेटा मागवून त्या डेटाच्या मदतीने लाभार्थी महिला या योजनेसाठी पात्र आहेत का नाही ते तपासणार आहेत . आता चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना बाहेर काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Read more…. या बँके मध्ये करा 444 दिवसा साठी FD, इतका मिळेल व्याजदर, जाणून घ्या संपूर्ण माहिती

ITR डेटा मुळे चुकीच्या महिला कळतील Ladaki Bahin Yojana 2025

मित्रानो 3 जून 2025 रोजी, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) एक अधिसूचना जारी केली आहे, ज्या अंतर्गत महाराष्ट्र सरकारच्या महिला आणि बाल विकास विभागाच्या सचिवांना आयकर भरणाऱ्यांची माहिती मिळविण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

हे ही वाचा 👇🏻  एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा - महागाई भत्त्यात ७% वाढ, जूनच्या पगारात मिळणार वाढीव रक्कम. DA Allowance

या मिळणाऱ्या माहितीचा उपयोग राज्यातील योजनेच्या ज्या पात्र महिला आहेत ते ( Ladaki Bahin Yojana 2025 ) ओळखण्यासाठी केला जाईल. सरकारकडून घेतलेले हे पाऊल आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून आलेल्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळेल याची खात्री करेल.

Read more….इस दिन देश भर में छुट्टि ; ये सब रहेगा बंद…. Click now 

योजनेत खोटी प्रकरणे समोर आली

मित्रानो नुकतेच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, 2200 हून अधिक सरकारी कर्मचारी महिलांनी चुकीच्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. हा खुलासा केला आहे, त्यानंतर सरकारने आता लाभार्थ्यांची पडताळणी प्रक्रिया अजुन अधिक कठोर करण्याचा निर्णय घेतला.

येणारी नवीन यंत्रणा कशी काम करेल

मित्रानो आता सरकार मार्फत लाभार्थी महिला कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आणि आयकर भरणा स्थितीची उलटतपासणी केली जाईल . कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याचे जर आढळून आले, किंवा कुटुंबातील सदस्य आयकर भरणारे असल्याचे आढळल्यास त्या महिलेला योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाही. यामुळे आता ज्या महिला पात्र नाहीत त्यांच्यावर सरकारची कात्री लागणार आहे.

हे ही वाचा 👇🏻  पॅन कार्ड नियमात १ एप्रिलपासून मोठे बदल, बनावट ओळख व फसवणूक रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय. Pan card new Update

Read more…..जेष्ठ नागरिकांसाठी हि योजना आहे बेस्ट,  जाणून घ्या संपूर्ण माहिती..

काय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना?

मित्रानो ही योजना महाराष्ट्र सरकारची प्रमुख योजना आहे, ज्याचे उद्दिष्ट फक्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आर्थिक सहाय्य देण्यात येते . महिलांना आत्मनिर्भर बनवणे आणि सामाजिक सुरक्षा मजबूत करणे हे त्याचे ध्येय आहे.

या महिलांसाठी ही योजना आहे

मित्रानो या योजनेत फक्त महाराष्ट्रातील महिलाच पात्र आहेत. 21 ते 65 वयोगटातील सर्व विवाहित, विधवा, घटस्फोटित, निर्जन आणि कुटुंबातील एकमेव अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यासाठी महिलेचे बँक खाते आधारशी जोडलेले असावे आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

हे ही वाचा 👇🏻  देशातील कर्मचाऱ्यांना २०२६ मध्ये सरासरी ९.१% वेतनवाढीची शक्यता; ‘एऑन’च्या अहवालात अंदाज. India salary hike 2026

Read more….Car insurance वर करा मोठी बचत, फक्त वापरा ही युक्ती

लाभ कोणाला मिळणार नाही?

या पात्रता नियमांची पूर्तता न करणाऱ्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामध्ये ज्या महिलांच्या कुटुंबातील कोणतेही सदस्य जर आयकरदाते म्हणजेच दरवर्षी ITR भरतात किंवा घरातील कोणताही सदस्य सरकारी विभाग, मंडळ किंवा स्थानिक संस्थेत नियमित कर्मचारी आहे किंवा पेन्शन घेत आहे.

अशा महिला या योजनेतून बाहेर पडतील. याशिवाय ज्यांच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे (ट्रॅक्टर वगळता) अशा कुटुंबातील  महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

Leave a Comment