Close Visit MahaNews12

६९ लाख पेन्शनधारकांची चिंता वाढली; कर्मचाऱ्यांनी केली मोदींकडे मोठी मागणी

नवी दिल्ली :  8th Pay Commission Pension : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसोबतच देशातील लाखो पेन्शनधारकांचे लक्ष सध्या ८व्या वेतन आयोगाकडे लागले आहे. मात्र, १ जानेवारी २०२६ पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये सुधारणा कशी होणार, याबाबत स्पष्टता नसल्याने पेन्शनधारकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

देशात सुमारे ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६९ लाख निवृत्तीवेतनधारक आहेत. त्यामुळे ८व्या वेतन आयोगाचा निर्णय मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शनधारकांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम करणारा ठरणार आहे.

पंतप्रधान मोदींना थेट पत्र

या पार्श्वभूमीवर ‘रिटायर्ड एम्प्लॉईज वेल्फेअर असोसिएशन’ म्हणजेच REWA या संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. ७ सप्टेंबर रोजी पाठवलेल्या या पत्रातून जुन्या पेन्शनधारकांच्या पेन्शन पुनर्रचनेबाबत स्पष्ट निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

संघटनेच्या म्हणण्यानुसार, ८व्या वेतन आयोगाच्या अटी व शर्तींमध्ये १ जानेवारी २०२६ पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि कौटुंबिक पेन्शनचा स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक आहे.

जुन्या पेन्शनधारकांना काय मिळणार? 8th Pay Commission Pension

पाचवा, सहावा आणि सातवा वेतन आयोग लागू करताना आधीच निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचाही विचार करण्यात आला होता. त्यामुळे यावेळीही जुन्या पेन्शनधारकांना वेतन आयोगाच्या लाभापासून दूर ठेवू नये, अशी मागणी संघटनेने केली आहे.

विशेषतः पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये सुधारणा करण्यासाठी स्पष्ट तरतूद करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे ८व्या वेतन आयोगाकडून जुन्या पेन्शनधारकांसाठी नेमका काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, जुन्या पेन्शनधारकांना ८व्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार नाही, असा कोणताही अंतिम सरकारी निर्णय सध्या झालेला नाही. मात्र, याबाबत स्पष्टता मिळावी यासाठी पेन्शनधारकांकडून सरकारकडे मागणी केली जात आहे. 8th Pay Commission Pension

1 thought on “६९ लाख पेन्शनधारकांची चिंता वाढली; कर्मचाऱ्यांनी केली मोदींकडे मोठी मागणी”

Leave a Comment