Close Visit MahaNews12

शासकीय कर्मचाऱ्यांच्या उत्सव अग्रिम रकमेत वाढ करण्याची मागणी; दुप्पट मिळणार उत्सव अग्रीम.?

Written by Vinod : मुंबई :  Government Employee Benefits : राज्यातील गट-ड अर्थात चतुर्थ श्रेणी शासकीय कर्मचाऱ्यांना सध्या मिळणाऱ्या उत्सव अग्रिम रकमेत वाढ करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सध्या मिळणारे १२ हजार ५०० रुपयांचे उत्सव अग्रिम वाढवून २५ हजार रुपये करण्यात यावे, अशी मागणी राज्य सरकारी गट-ड कर्मचारी मध्यवर्ती महासंघ, महाराष्ट्र यांनी केली आहे.

यासंदर्भात महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्र्यांकडे निवेदन सादर केले आहे. या निवेदनातून उत्सव अग्रिमाच्या विद्यमान मर्यादेत वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय उत्सव तसेच विविध धार्मिक सणांच्या खर्चासाठी उत्सव अग्रिमाची सुविधा दिली जाते. मात्र, सध्याची १२ हजार ५०० रुपयांची मर्यादा मागील काही वर्षांपासून वाढविण्यात आलेली नसल्याचे महासंघाने निवेदनात नमूद केले आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मागणी. Government Employee Benefits

दिवाळी हा मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणारा सण असल्याने या काळात कर्मचाऱ्यांचा खर्च वाढतो. त्यातच वाढती महागाई लक्षात घेता सध्याची उत्सव अग्रिमाची रक्कम अपुरी पडत असल्याचा दावा महासंघाने केला आहे.

महासंघाच्या म्हणण्यानुसार, शासनातील सुमारे ९० टक्के कर्मचारी दिवाळीच्या काळात उत्सव अग्रिम घेतात. त्यामुळे आगामी दिवाळीपूर्वी या अग्रिमाची मर्यादा वाढवून २५ हजार रुपये करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

शासनाच्या निर्णयाकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष. Government Employee Benefits

महासंघाने आपले निवेदन माहिती आणि आवश्यक कार्यवाहीसाठी वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडेही सादर केले आहे. त्यामुळे या मागणीवर शासनाकडून काय निर्णय घेतला जातो, याकडे राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाचे : सध्या २५ हजार रुपयांचे उत्सव अग्रिम मंजूर झाल्याची अधिकृत माहिती नाही. ही रक्कम वाढविण्याची कर्मचारी महासंघाची मागणी आहे.

1 thought on “शासकीय कर्मचाऱ्यांच्या उत्सव अग्रिम रकमेत वाढ करण्याची मागणी; दुप्पट मिळणार उत्सव अग्रीम.?”

Leave a Comment