अर्थसंकल्प 2026: कॅन्सर, डायबेटिजची औषधे स्वस्त होणार; बायोफार्म सेक्टरसाठी 10 हजार कोटींचा फंड

Irfan Shaikh ✅
2 Min Read

अर्थसंकल्प 2026: कॅन्सर, डायबेटिजची औषधे स्वस्त होणार; बायोफार्म सेक्टरसाठी 10 हजार कोटींचा फंड. Union Budget 2026

नवी दिल्ली :  Union Budget 2026 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत अर्थसंकल्प 2026 सादर केला. या अर्थसंकल्पात गरीब जनता, एससी-एसटी समाजघटक आणि शेतकऱ्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी ‘रिफॉर्म एक्सप्रेस’चा उल्लेख करत देशाची आर्थिक सुधारणा योग्य मार्गावर सुरू असल्याचे स्पष्ट केले.

अर्थसंकल्पात बायोफार्म आणि सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. विशेषतः बायोफार्म सेक्टरच्या विकासामुळे कॅन्सर, डायबेटिससारख्या गंभीर आजारांवरील औषधे स्वस्त होणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

हे ही वाचा 👇🏻  आरबीआय नवीन नियम लागू करणार, लोकांवर काय होणार परिणाम, जाणून घ्या सविस्तर माहिती.Rbi latest news

बायोफार्म सेक्टरसाठी 10 हजार कोटींचा SME ग्रोथ फंड. Union Budget 2026

देशात बायोफार्म क्षेत्राला चालना देण्यासाठी 10 हजार कोटी रुपयांचा SME ग्रोथ फंड जाहीर करण्यात आला आहे. ही तरतूद पुढील पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. यामुळे भारताला जागतिक बायो-फार्मास्युटिकल उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्याचा सरकारचा मानस आहे.

‘बायो फार्मा शक्ती’ योजनेअंतर्गत जैविक आणि बायोसिमिलर औषधांच्या देशांतर्गत उत्पादनासाठी मजबूत इकोसिस्टम तयार केली जाणार आहे. याचा थेट फायदा रुग्णांना होणार असून महागडी औषधे परवडणाऱ्या दरात उपलब्ध होतील.

शहरांच्या विकासावर भर

अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी शहरांमध्ये नवीन आर्थिक क्षेत्रे निर्माण करण्याची घोषणा केली. 2026-27 या आर्थिक वर्षात 12.2 लाख कोटी रुपयांचा भांडवली खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. Union Budget 2026

हे ही वाचा 👇🏻  RBI ने गृह कर्ज घेणाऱ्यांच्या हितासाठी जाहिर केले नवीन नियम, जाणून घ्या संपूर्ण माहिती. Bank home loan update

टियर-2 आणि टियर-3 शहरांमधील पायाभूत सुविधांचे बळकटीकरण केले जाणार असून 5 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये विशेष विकास प्रकल्प राबवले जाणार आहेत. तसेच आंशिक कर्ज हमीसाठी ‘इन्फ्रा रिस्क गॅरंटी फंड’ स्थापन करण्याची घोषणाही करण्यात आली आहे. Union Budget 2026

Follow:
नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *