मुंबई : Teacher Day 2026 : शिक्षक दिनाच्या निमित्ताने राज्यातील विशेष शिक्षकांचा सन्मान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘दिशा’ अभियानाशी संबंधित विशेष शिक्षकांना त्यांच्या योगदानाबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. याबाबत जिल्हानिहाय कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी विशेष शिक्षकांचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आला. यावेळी विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या शिक्षकांच्या योगदानाचे कौतुक करण्यात आले.
‘दिशा’ अभियानाच्या माध्यमातून विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या अभियानाशी राज्यातील ३६ जिल्ह्यांमधील ४५० हून अधिक शाळा, सुमारे २७०० शिक्षक आणि २१ हजारांहून अधिक दिव्यांग व बौद्धिक अक्षमता असलेले विद्यार्थी जोडले गेले आहेत.
विशेष विद्यार्थ्यांच्या शिक्षणात केवळ त्यांच्या शैक्षणिक प्रगतीकडे न पाहता आत्मविश्वास, सामाजिक सहभाग आणि सर्वांगीण विकासालाही महत्त्व देणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
दरम्यान, विशेष विद्यार्थ्यांना शिकविण्याबाबत अधिक शिक्षकांना प्रशिक्षण मिळावे यासाठी नियमित शिक्षकांच्या प्रशिक्षणामध्ये ‘दिशा’ अभ्यासक्रमाचा समावेश करण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये विशेष गरजांची वेळेत ओळख होण्यासाठी प्रशिक्षण मॉड्यूल विकसित करण्यावरही भर दिला जाणार आहे. Teacher Day 2026
कार्यक्रमात यामिनी काळे, अण्णासाहेब कदम, वैशाली गायकवाड, ज्ञानेश्वर काळे आणि मानसी मुलाम या पाच विशेष शिक्षकांचा प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर राज्यातील इतर विशेष शिक्षकांचाही जिल्हानिहाय गौरव करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .








