SIR कामासाठी BLO व पर्यवेक्षकांना मोठा दिलासा! वार्षिक मानधनाव्यतिरिक्त ₹6,000 मानधन मंजूर; शिक्षकांसाठीही महत्त्वाचे आदेश

Irfan Shaikh ✅

SIR कामासाठी BLO व पर्यवेक्षकांना मोठा दिलासा! वार्षिक मानधनाव्यतिरिक्त ₹6,000 मानधन मंजूर; शिक्षकांसाठीही महत्त्वाचे आदेश

मुंबई : विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) मोहिमेत काम करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) आणि BLO पर्यवेक्षकांसाठी निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. 14 जुलै 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, SIR मोहिमेत सहभागी प्रत्येक BLO आणि BLO पर्यवेक्षकाला त्यांच्या वार्षिक मानधनाव्यतिरिक्त ₹6,000 चे एकरकमी मानधन देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

हा निर्णय महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, पंजाब, हरियाणा, झारखंड, ओडिशा, दिल्ली, उत्तराखंड, त्रिपुरा, नागालँड, मेघालय, मिझोराम, सिक्कीम, मणिपूर तसेच इतर संबंधित राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू करण्यात आला आहे.

हे ही वाचा 👉🏻  मुलींसाठी सरकारची मोठी योजना, मिळणार ₹50,000 पर्यंत लाभ. Majhi Kanya Bhagyashree Scheme 2026

शिक्षकांसाठी स्वतंत्र सूचना

दरम्यान, शिक्षण संचालनालयाने 7 जुलै 2026 रोजी BLO म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांसाठीही महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. विधानसभा मतदारयादी विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) सुमारे 24 वर्षांनंतर होत असल्याने हे राष्ट्रीय महत्त्वाचे काम असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

शाळांनी काय करावे?

आदेशानुसार, 30 जुलै 2026 पर्यंत BLO म्हणून नियुक्त शिक्षकांच्या अध्यापनाचे नियोजन शक्यतो कमी तासांचे व सलग करण्यात यावे. तसेच शाळा शक्य असल्यास सकाळच्या सत्रात भरविण्याचे नियोजन करावे, जेणेकरून शिक्षकांना उर्वरित वेळेत BLO म्हणून नेमून दिलेली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडता येईल.

हे ही वाचा 👉🏻  आठवडाभरात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण; बाजारात सावध वातावरण. Gold Price Today

इतर शिक्षकांनीही सहकार्य करावे

BLO म्हणून नियुक्ती नसलेल्या शिक्षकांनी आवश्यकतेनुसार BLO शिक्षकांना शैक्षणिक व प्रशासकीय कामात सहकार्य करावे. तसेच शाळा प्रमुखांनी अंतर्गत कामाचे नियोजन अशा प्रकारे करावे की BLO शिक्षकांवर अतिरिक्त कामाचा ताण येणार नाही.

अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश

शिक्षण संचालनालयाने सर्व शाळांना या सूचनांची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले असून, करण्यात आलेल्या कार्यवाहीचा एकत्रित अनुपालन अहवाल विहित नमुन्यात व निर्धारित कालावधीत सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत. SIR मोहिमेचे काम वेळेत आणि अचूकपणे पूर्ण करण्यासाठी हे आदेश महत्त्वाचे मानले जात आहेत.

Pages

Follow:
नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *