सोलापूर विद्यापीठात 150 कंत्राटी पदांची भरती; लिपिक, शिपाई पदांसह अनेकांना संधी.

Irfan Shaikh ✅

सोलापूर :  Solapur University Recruitment : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात लवकरच सुमारे 150 कंत्राटी पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी विद्यापीठाने नवीन सेवा पुरवठादार (एजन्सी) निवडण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली असून, ती पूर्ण झाल्यानंतर भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.

विद्यापीठातील परीक्षा, आस्थापना, वित्त, शिक्षक मान्यता विभाग तसेच 11 विविध संकुलांमध्ये दरवर्षी 11 महिन्यांच्या कालावधीसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. या भरतीमध्ये लिपिक, शिपाई यांसारख्या पदांचा समावेश असतो.

2025-26 साठी नियुक्त करण्यात आलेल्या सेवा पुरवठादाराची मुदत संपल्यामुळे आता नवीन एजन्सीची निवड केली जात आहे. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा संपविण्यात आली असून, पुढील काही दिवसांत नवीन भरतीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा 👉🏻  रस्ते अपघात भरपाई कायदा – कधी आणि कसा दावा करायचा? Accident lawyer 

या पदांसाठी चांगले मानधन मिळत असल्याने पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेले अनेक उमेदवार अर्ज करतात. अर्जदारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. विभागांच्या गरजेनुसार टप्प्याटप्प्याने नियुक्त्या करण्यात येतील.

128 कंत्राटी शिक्षकांचीही होणार नियुक्ती

विद्यापीठातील 11 संकुलांमध्ये सुमारे 5 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्या अध्यापनासाठी 128 कंत्राटी शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया देखील सुरू आहे. मुलाखतीनंतर पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, 15 दिवसांनंतर रिक्त राहिलेल्या जागांसाठी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची निवड करून दुसरी गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.

हे ही वाचा 👉🏻  केंद्रीय सरकारची कर्मचाऱ्यांसाठी ESIC योजना सुरु, वैद्यकीय खर्च, पेंशन मिळणार.  ESIC Scheme 2026

या कंत्राटी शिक्षकांना दरमहा ₹25,000 ते ₹30,000 इतके मानधन मिळणार आहे. उच्च शिक्षण विभागाकडून वाढीव पदांना मंजुरी नसल्याने या शिक्षकांचा आर्थिक भार विद्यापीठालाच उचलावा लागत आहे.

भरती प्रक्रिया लवकरच सुरू. Solapur University Recruitment

विद्यापीठ प्रशासनाच्या माहितीनुसार, विविध विभागांकडून प्राप्त झालेल्या मागणीनुसार दरवर्षी कंत्राटी पदे भरली जातात. यंदाची निविदा प्रक्रिया सुरू झाली असून, सेवा पुरवठादाराची निवड पूर्ण होताच कंत्राटी पदभरतीची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू केली जाणार आहे.

Pages

Follow:
नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *