मुंबई, दि. १७ : एसटीने प्रवाशांसाठी डिजिटल सुविधेच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आता NCMC कार्डधारकांना BHIM Appच्या माध्यमातून घरबसल्या आपल्या कार्डचे Top-up करता येणार आहे. त्यामुळे कार्डमधील पैसे संपल्यानंतर रिचार्ज करण्यासाठी केंद्रावर जाण्याची गरज भासणार नाही.
NCMC कार्ड प्रकल्पांतर्गत अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला सवलतधारक प्रवाशांना कार्डची सुविधा देण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रवाशांना कार्ड वापरताना रिचार्ज करणे अधिक सोपे व्हावे, यासाठी १५ सप्टेंबर २०२६ पासून BHIM Appद्वारे Top-upची सुविधा सुरू करण्यात आली आहे.
फक्त QR कोड स्कॅन करा
NCMC कार्ड रिचार्ज करण्यासाठी कार्डच्या मागील बाजूस असलेला QR कोड BHIM Appमधून स्कॅन करावा लागेल. त्यानंतर अॅपमध्ये दिलेल्या प्रक्रियेनुसार Top-up करता येईल.
म्हणजेच, कार्डमध्ये शिल्लक रक्कम कमी झाली किंवा संपली तरी रिचार्ज करण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही. मोबाईलवरूनच कार्डमध्ये आवश्यक रक्कम जमा करता येणार आहे.

ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मोठा फायदा
या सुविधेमुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांचा रिचार्जसाठी होणारा त्रास कमी होणार आहे. एसटी महामंडळाकडून प्रवाशांना अधिक सुलभ आणि डिजिटल सेवा देण्याच्या दृष्टीने ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.
NCMC कार्डचा वापर वाढवताना त्याचे Top-upही सोपे व्हावे, यामुळे प्रवाशांना दैनंदिन प्रवासात अधिक सुविधा मिळणार आहे.

नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .







