Close Visit MahaNews12

महाराष्ट्राच्या मतदार यादीतून 2 कोटींहून अधिक नावे वगळली; तुमचे नाव आहे का? असे तपासा

महाराष्ट्राच्या मतदार यादीतून 2 कोटींहून अधिक नावे वगळली; तुमचे नाव आहे का? असे तपासा

मुंबई :  Maharashtra Voter List 2026 : महाराष्ट्रातील मतदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SIR प्रक्रियेनंतर राज्याची प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. या प्रक्रियेत जुन्या मतदार यादीच्या तुलनेत तब्बल 2 कोटी 6 लाखांहून अधिक नावे कमी झाल्याचे समोर आले आहे.

मतदार यादीच्या पुनरिक्षणादरम्यान मृत व्यक्तींची नावे, दुबार नोंदी तसेच स्थलांतरित मतदारांच्या नोंदी तपासण्यात आल्या. त्यानंतर अनेक नावे प्रारूप मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. मात्र, यामध्ये आपले नाव चुकून वगळले गेले आहे का, हे प्रत्येक पात्र मतदाराने तपासणे आवश्यक आहे.

मतदार यादीत आपले नाव आहे का?

मतदारांना आपले नाव ऑनलाइन तपासता येणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाच्या Voters’ Services Portal वर जाऊन मतदाराचे नाव, EPIC क्रमांक किंवा इतर उपलब्ध माहितीच्या आधारे शोध घेता येईल.

नव्या प्रारूप यादीत नाव दिसत नसल्यास संबंधित मतदाराने त्याकडे दुर्लक्ष करू नये. आपण पात्र मतदार असाल आणि आपले नाव यादीतून वगळले गेले असेल, तर निर्धारित मुदतीत दावा दाखल करून नाव पुन्हा समाविष्ट करण्याची संधी आहे.

नाव वगळले असल्यास काय करावे? Maharashtra Voter List 2026

मतदार यादीत नाव नसल्यास नवीन नोंदणीसाठी Form 6 भरता येतो. मतदार यादीतील नाव, पत्ता किंवा इतर तपशीलात दुरुस्ती करायची असल्यास Form 8 चा वापर करता येतो.

तसेच एखाद्या व्यक्तीचे नाव चुकीने मतदार यादीत असल्यास ते वगळण्यासाठी Form 7 द्वारे हरकत नोंदवता येते.

30 सप्टेंबरपर्यंत दावा दाखल करता येणार

प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांना 30 सप्टेंबर 2026 पर्यंत दावा किंवा हरकत दाखल करण्याची संधी देण्यात आली आहे. त्यानंतर प्राप्त दावे आणि हरकतींची पडताळणी केली जाईल.

पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 4 नोव्हेंबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.

त्यामुळे मतदारांनी आपले नाव सध्याच्या प्रारूप मतदार यादीत आहे की नाही, हे एकदा आवर्जून तपासावे. नाव नसल्यास मुदत संपण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रांसह दावा दाखल करणे महत्त्वाचे ठरणार आहे. Maharashtra Voter List 2026

Leave a Comment