Close Visit MahaNews12

संपात सहभागी झालेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीबाबत शासनाचा निर्णय. Maharashtra Government Resolution

मुंबई :  Maharashtra Government Resolution :  महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचारी संघटना, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना तसेच महाराष्ट्र व राज्य सरकारी गट-क कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीबाबत राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील विविध कर्मचारी संघटनांनी २१ एप्रिल २०२६ ते २४ एप्रिल २०२६ या कालावधीत विविध प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला होता. या संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती नियमित करण्याबाबत शासनाकडे मागणी करण्यात आली होती.

यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने २५ मे २०२६ रोजी शासन निर्णय जारी केला आहे.

संपातील अनुपस्थिती अर्जित रजा म्हणून नियमित. Maharashtra Government Resolution

शासन निर्णयानुसार, २१ एप्रिल २०२६ ते २४ एप्रिल २०२६ या कालावधीत संपात सहभागी झालेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती ‘अर्जित रजा’ म्हणून नियमित करता येणार आहे.

मात्र, ही सवलत संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांपुरतीच मर्यादित आहे. तसेच शासन निर्णयात नमूद केलेल्या अटी व तरतुदींनुसारच अनुपस्थिती नियमित केली जाणार आहे.

शासनाने स्पष्ट केले आहे की, संबंधित कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीचा कालावधी अर्जित रजा’ म्हणून नियमित करण्यात यावा. त्यामुळे संपाच्या काळात गैरहजर राहिलेल्या कर्मचाऱ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

शासन संकेतस्थळावर निर्णय उपलब्ध

हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. संबंधित कार्यालयांनी आणि विभागांनी शासन निर्णयातील तरतुदीनुसार पुढील कार्यवाही करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

शासन निर्णय : सामान्य प्रशासन विभाग
दिनांक : २५ मे २०२६
विषय : संपात सहभागी झालेल्या शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती नियमित करण्याबाबत.

Leave a Comment