राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 3% डीए वाढ, महागाई भत्ता 58% होणार? DA Hike News

Irfan Shaikh ✅
2 Min Read

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 3% डीए वाढ, महागाई भत्ता 58% होणार? DA Hike News

DA Hike News :  महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (Dearness Allowance – DA) लवकरच वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या 55% असलेला महागाई भत्ता 3% ने वाढून 58% होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना यापूर्वीच 55% वरून 58% महागाई भत्ता देण्यात आला असून ही वाढ जुलै 2025 पासून लागू करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही डीए वाढ मिळणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. मात्र, अद्याप राज्य शासनाकडून याबाबत अधिकृत शासन निर्णय (GR) जाहीर करण्यात आलेला नाही.

हे ही वाचा 👉🏻  2025 मध्ये सर्वोत्तम म्युच्युअल फंड कोणता? गुंतवणूकदारांसाठी मार्गदर्शक, mutual fund investment 2025

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीचा निर्णय लांबणीवर पडल्याचे सांगितले जात आहे. दिवाळीपूर्वीच डीए वाढीचा लाभ मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र आचारसंहितेमुळे हा निर्णय पुढे ढकलण्यात आला.

DA वाढ कधी होणार? DA Hike News

मिळालेल्या माहितीनुसार, महापालिका निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुका 15 जानेवारी 2026 रोजी पार पडणार असून त्यांचा निकाल 16 जानेवारी 2026 रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे 16 जानेवारीनंतर कधीही 3% डीए वाढीचा शासन निर्णय जाहीर होऊ शकतो.

हे ही वाचा 👉🏻  आता जेष्ठ नागरिकांना फ्री मध्ये मिळणार या सुविधा, लाभ कसा घ्यावा, जाणून घ्या सर्व माहिती.Senior citizens saving schemes

रिपोर्टनुसार, जानेवारी महिन्यात डीए वाढीचा अधिकृत GR निघण्याची शक्यता असून त्याचा प्रत्यक्ष लाभ फेब्रुवारी महिन्यात मिळणाऱ्या पगारासोबत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होईल. तसेच जुलै 2025 ते डिसेंबर 2025 या कालावधीतील महागाई भत्ता फरकाची रक्कम (Arrears) देखील कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. DA Hike News

दरम्यान, महागाई भत्ता वाढीचा निर्णय नेमका कधी जाहीर होणार याबाबत शासनाकडून अद्याप अधिकृत तारीख स्पष्ट करण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष आता जानेवारी महिन्याकडे लागले असून सरकार डीए वाढीचा निर्णय कधी घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Follow:
नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *