मुंबई : Government Resolution 2026 : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी भाषा परीक्षेसंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. मराठी भाषा विभागाने 31 ऑगस्ट 2026 रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार, भाषा संचालनालयामार्फत घेण्यात येणारी हिंदी भाषा परीक्षा रद्द करण्यात आली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 7 मे 2026 रोजी हिंदी भाषा परीक्षेला स्थगिती दिल्याच्या तारखेपासून करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्याची स्थापना होण्यापूर्वी तत्कालीन मुंबई सरकारच्या काळात सरकारी कामकाजासाठी हिंदी भाषेचा वापर करण्याच्या उद्देशाने शासकीय कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक करण्यात आले होते. मात्र, महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर राज्यातील शासकीय कामकाजासाठी मराठी भाषेचा वापर करण्यात येत आहे.
दरम्यान, सध्याच्या शासकीय कामकाजाचे स्वरूप आणि महाराष्ट्र राजभाषा अधिनियमातील तरतुदी लक्षात घेता हिंदी भाषा परीक्षा सुरू ठेवण्याची आवश्यकता नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. राज्य शासनाच्या कामकाजात हिंदी भाषेचा वापर तुलनेने अत्यल्प असून केंद्र सरकार तसेच इतर राज्यांशी होणारा पत्रव्यवहार प्रामुख्याने इंग्रजी भाषेत केला जात असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. Government Resolution 2026
या पार्श्वभूमीवर भाषा संचालनालयामार्फत घेतली जाणारी हिंदी भाषा परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच हिंदी भाषा परीक्षेसंदर्भात यापूर्वी जारी करण्यात आलेले शासन निर्णय या नव्या निर्णयाद्वारे अधिक्रमित करण्यात आले आहेत.

कर्मचाऱ्यांसाठी याचा अर्थ काय?
या निर्णयामुळे संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांवर लागू असलेली हिंदी भाषा परीक्षा देण्याची प्रक्रिया रद्द होणार आहे. विशेष म्हणजे, शासन निर्णयाची अंमलबजावणी 7 मे 2026 पासून करण्यात येणार असल्याने या तारखेपासून त्याचा प्रभाव मानला जाणार आहे. Government Resolution 2026
मराठी भाषा विभागाने जारी केलेल्या या निर्णयामुळे शासकीय कर्मचाऱ्यांसाठी लागू असलेल्या भाषा परीक्षेच्या नियमांमध्ये बदल झाला आहे.

नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .







