NPS-UPS खातेदारांसाठी मोठा निर्णय! PRAN खात्यात अंशदान वेळेत जमा होणार; वित्त विभागाची सुधारित कार्यपद्धती जाहीर

Irfan Shaikh ✅

दिल्ली : Government Pension Scheme   राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (NPS) आणि एकीकृत निवृत्ती वेतन योजना (UPS) अंतर्गत येणाऱ्या राज्य सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. वित्त विभागाने सुधारित कार्यपद्धती जाहीर करत कर्मचाऱ्यांच्या PRAN (Permanent Retirement Account Number) खात्यात मासिक अंशदान वेळेत जमा होण्यासाठी नवी व्यवस्था लागू केली आहे.

नवीन शासन निर्णयानुसार, NPS आणि UPS अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या मासिक अंशदानाची रक्कम प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी PRAN खात्यात जमा होईल. यासाठी वेतन प्रक्रिया, ई-कुबेर प्रणाली आणि ई-बिल प्रणालीमध्ये आवश्यक तांत्रिक बदल करण्यात आले आहेत.

हे ही वाचा 👇🏻  15 जुलै 2025 रोजी होणार Kia Carens Clavis EV लॉन्च, जाणून घ्या अपेक्षित किंमत आणि टॉप 10 वैशिष्ट्ये. Kia Carens Clavis EV launch

सरकारने वेतन देयकांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला असून, प्रत्येक महिन्याच्या २२ तारखेपर्यंत वेतन देयकांचे प्रमाणक क्रमांक (Token Number) तयार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे वेतन प्रक्रिया वेळेत पूर्ण होऊन निवृत्ती निधीतील अंशदानात विलंब होणार नाही.

तसेच, ई-कुबेर प्रणालीद्वारे वेतनाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करताना “Not Payable Before the First Day of the Next Month or Due Date” असा शेरा नोंदवून पुढील महिन्याच्या पहिल्या दिवशी किंवा देय तारखेला वेतन जमा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

या शासन निर्णयात NPS अंतर्गत कर्मचाऱ्यांचे १० टक्के अंशदान आणि शासनाचे १४ टक्के अंशदान, तसेच UPS योजनेतील लागू असलेल्या अंशदानाची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी ई-बिल सेवार्थ प्रणालीमध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

हे ही वाचा 👇🏻  लेव्हल 1 ते 7 कर्मचारी किती पगार मिळवतील? ८व्या वेतन आयोगाचा संपूर्ण अंदाज. Fitment Factor Update

या सुधारित कार्यपद्धतीमुळे कर्मचाऱ्यांच्या PRAN खात्यात निवृत्ती निधीची रक्कम वेळेत जमा होईल. तसेच आर्थिक व्यवहार अधिक पारदर्शक, अचूक आणि कार्यक्षम होतील, असा विश्वास वित्त विभागाने व्यक्त केला आहे. NPS आणि UPS अंतर्गत कार्यरत लाखो अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

Follow:
नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *