Close Visit MahaNews12

8 वा वेतन आयोग : पगारवाढीच्या अपेक्षांना धक्का? ₹69,000 किमान वेतनाचे स्वप्न अपूर्ण राहण्याची शक्यता

नवी दिल्ली : Fitment Factor  आठव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत असलेल्या केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कर्मचारी संघटनांकडून 3.83 फिटमेंट फॅक्टरची मागणी करण्यात आली असली, तरी आयोगाकडून सुमारे 2.57 ते 2.86 फिटमेंट फॅक्टर सुचवला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अपेक्षेइतकी पगारवाढ मिळणार नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.

फिटमेंट फॅक्टरवरच पगारवाढ ठरणार

फिटमेंट फॅक्टर हा सुधारित मूळ वेतन आणि निवृत्तीवेतन निश्चित करण्यासाठीचा महत्त्वाचा निकष आहे. याच फॅक्टरच्या आधारे कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा अंतिम आकडा ठरतो. त्यामुळे आठव्या वेतन आयोगातील सर्वाधिक लक्ष याच मुद्द्याकडे लागले आहे.

₹69,000 किमान वेतनाचे स्वप्न धूसर?

कर्मचारी संघटनांनी 3.83 फिटमेंट फॅक्टर लागू करण्याची मागणी केली आहे. ही मागणी मान्य झाल्यास किमान मूळ वेतन सुमारे ₹69,000 पर्यंत जाऊ शकते. मात्र, सरकारने 2.57 किंवा 2.86 फिटमेंट फॅक्टर स्वीकारल्यास ही अपेक्षा पूर्ण होण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे.

2.86 फिटमेंट फॅक्टरनुसार संभाव्य वेतन

  • ₹18,000 → ₹51,480
  • ₹19,900 → ₹56,914
  • ₹21,700 → ₹62,062
  • ₹25,500 → ₹72,930
  • ₹29,200 → ₹83,512
  • ₹35,400 → ₹1,01,244
  • ₹44,900 → ₹1,28,414
  • ₹56,100 → ₹1,60,446

सरकार आर्थिक भाराचा विचार करत आहे

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार आणि राज्य सरकारांवरील आर्थिक भार लक्षात घेऊन आयोग सावध भूमिका घेण्याची शक्यता आहे. विविध राज्यांशी सल्लामसलत, कर्मचारी संघटनांच्या मागण्या आणि आर्थिक परिणामांचा अभ्यास केल्यानंतर आयोग अंतिम अहवाल तयार करणार आहे. Fitment Factor 

दरम्यान, फिटमेंट फॅक्टरबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे अंतिम निर्णय येईपर्यंत कर्मचाऱ्यांनी समोर येणाऱ्या आकडेवारीकडे शक्यता म्हणूनच पाहावे.

Leave a Comment