पाटोदा आगारात महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेची वार्षिक सभा, उपस्थित राहण्याचे संघटनेकडून आवाहन .

Irfan Shaikh ✅
1 Min Read

प्रतिनिधी. दि 9 फेब्रुवारी 2026 

पाटोदा : ST Employees News : एकमेव मान्यता प्राप्त महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटना, पाटोदा आगाराची सन 2026-27 साठीची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, दि. 11 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता पाटोदा आगार येथे आयोजित करण्यात आली आहे.  या बैठकीमध्ये वार्षिक कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे .

यावर्षी मोठ्या संख्येने एस.टी. कामगारांनी संघटनेवर विश्वास ठेवत दुसऱ्या अनेक संघटनामधून अधिकृतरीत्या कामगार संघटनेमध्ये जाहीर प्रवेश केला असून, त्या विश्वासास संघटना कुठल्याही परिस्थितीत तडा जाऊ देणार नसल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

हे ही वाचा 👉🏻  तुम्ही घरी किती रोख रक्कम ठेवू शकता? नवीन नियम जाणून घ्या.Cash Limit at Home

या महत्त्वपूर्ण बैठकीस बीड विभागीय सचिव, गणेश चव्हाण साहेब विभागीय अध्यक्ष श्री. चातुर साहेब,  श्री. श्रीकांत येडे साहेब तसेच वल्लभ चिर्के साहेब , यांच्यासह संपूर्ण विभागीय शिष्टमंडळ उपस्थित राहणार आहे.

एस.टी. कामगारांच्या विविध प्रश्नांवर, तसेच आगारातील अडचणीवर चर्चा होणार असुन , आणि नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असल्याने या बैठकीस महत्व प्राप्त झाले आहे पाटोदा आगारातील सर्व सभासदांनी वेळेवर व मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आगार संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

हे ही वाचा……..

🙋🏻‍♂️ *एसटी बस प्रवाशांसाठी मोठी बातमी! सेवा विस्कळीत होण्याची शक्यता; कर्मचाऱ्यांकडून सरकारला 3 दिवसांचा ‘अल्टिमेटम’* 👇🏻

हे ही वाचा 👉🏻  महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी. वाचा संपूर्ण माहिती. Maharashtra hospital scheme 

https://employeesindia.in/2026/02/08/maharashtra-st-strike-news/

Follow:
नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *