अर्जित रजा रोखीकरणाबाबत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक जारी. Leave Encashment Rules 2026

अर्जित रजा रोखीकरणाबाबत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक जारी.

मुंबई : दि 7 फेब्रुवारी 2026, प्रतिनिधी Leave Encashment Rules 2026 अशासकीय खाजगी प्राथमिक शाळांतील मुख्याध्यापकांच्या अर्जित रजा रोखीकरणासंदर्भात प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत दि. 05.02.2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.

या परिपत्रकानुसार, अशासकीय खाजगी प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांच्या अर्जित रजा रोखीकरणाबाबत विविध शिक्षक संघटनांकडून वारंवार विचारणा करण्यात येत होती. तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, कोल्हापूर यांच्या सरचिटणीस यांनी शासनास अहवाल पाठविण्याबाबत निवेदन दिले होते. हे निवेदन संचालनालयास प्राप्त झाल्यानंतर शासनाने सदर बाबी स्पष्ट केल्या आहेत.

हे ही वाचा…..

ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा, ८ दिवसांत खात्यात PF जमा होणार


अर्जित रजा संदर्भातील नियम काय सांगतात?  Leave Encashment Rules 2026

1️⃣ 1981 च्या नियमांनुसार तरतूद

महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवा) नियम, 1981 मधील नियम 16 नुसार, मोठ्या सुट्टीच्या कालावधीत कराव्या लागणाऱ्या कामाच्या भरपाईपोटी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांना
👉 दि. 01.04.1981 पासून सेवेच्या प्रत्येक पूर्ण वर्षासाठी 15 दिवसांची अर्जित रजा अनुज्ञेय आहे.

हे ही वाचा 👇🏻  वेतन प्रणालीत ५ मोठे बदल : ६ दशके जुना नियम रद्द होणार.Changes in Payroll System

मात्र,
➡️ पूर्वीची शिल्लक अर्जित रजा आणि नव्याने मिळणारी अर्जित रजा मिळून 300 दिवस पूर्ण झाल्यावर पुढील अर्जित रजा मिळणे बंद होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा 


2️⃣ 04 ऑगस्ट 1995 च्या शासन निर्णयातील तरतूद

शालेय शिक्षण विभागाच्या दि. 04.08.1995 रोजीच्या शासन निर्णयानुसार, दीर्घ सुट्टी विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये —

  • शिक्षक वर्ग
  • मुख्याध्यापक
  • प्रयोगशाळा सहाय्यक

यांचा समावेश करण्यात आला आहे.

या कर्मचाऱ्यांना
👉 20 दिवसांच्या अर्धपगारी रजेऐवजी 10 दिवसांची अर्जित रजा मंजूर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हे ही वाचा 👇🏻  महाराष्ट्रात वीज बिल माफी योजनेची घोषणा, कोणाला मिळणार लाभ आणि कशी करावी अर्ज प्रक्रिया?Vij bill mafi yojana

❗ मात्र, ही अर्जित रजा रोखीत वटवता (Cash) येणार नाही, अशी स्पष्ट तरतूद शासन निर्णयात करण्यात आली आहे.

हे ही वाचा…….

EPS-95 पेन्शनवाढीबाबत केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट; 7,500 रुपये किमान पेन्शनचा प्रस्ताव नाही.


प्राथमिक शाळांतील मुख्याध्यापकांनाही नियम लागू

वरील तरतुदी अशासकीय प्राथमिक शाळांतील मुख्याध्यापकांनाही लागू आहेत का? याबाबत स्पष्टता मागविण्यात आली होती.
या संदर्भात शासनाने, संबंधित शासन निर्णय व नियमांनुसारच कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.


थोडक्यात महत्त्वाचे मुद्दे : Leave Encashment Rules 2026

  • अर्जित रजा रोखीकरणाबाबत 05.02.2026 रोजी शासन परिपत्रक
  • 1981 च्या नियमांनुसार दरवर्षी 15 दिवस अर्जित रजा
  • 300 दिवसांनंतर पुढील अर्जित रजा बंद
  • 1995 च्या शासन निर्णयानुसार 10 दिवस अर्जित रजा
  • अर्जित रजा रोखीकरणास मनाई
  • प्राथमिक शाळांतील मुख्याध्यापकांनाही नियम लागू.

EPS-95 पेन्शनवाढीबाबत केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट; 7,500 रुपये किमान पेन्शनचा प्रस्ताव नाही. EPS-95 Pension News

Leave a Comment