मोठा निर्णय! सर्विस रेकॉर्ड अपडेट नसल्यास वेतन, थकीत रक्कम अदा होणार नाही. Maharashtra Salary Update

Irfan Shaikh ✅

Maharashtra Salary Update : राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शालार्थ प्रणालीमध्ये डिजिटल सर्विस रेकॉर्ड अपलोड करण्याबाबत दि. 09 एप्रिल 2026 रोजी श्री. पवन जोशी (बिझनेस ॲनालिस्ट) यांच्या मार्फत महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

कागदपत्रे अपलोड नसल्यास वेतन बंद

या परिपत्रकानुसार, ज्या कर्मचाऱ्यांची आवश्यक कागदपत्रे शालार्थ प्रणालीवर योग्यरीत्या अपलोड झालेली नाहीत, अशा कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते, थकीत वेतन तसेच वैद्यकीय बिलांची रक्कम दि. 15 फेब्रुवारी 2026 पासून अदा करण्यात येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. याचा परिणाम संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांवरही होणार आहे.

हे ही वाचा 👇🏻  ६९ लाख पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या संपूर्ण माहिती. Pensioners big news today

रिजेक्ट कागदपत्रांवर तातडीने निर्णय आवश्यक. Maharashtra Salary Update

ज्या शिक्षक किंवा शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे DDO-2, शिक्षणाधिकारी, विभागीय उपसंचालक किंवा सचिव स्तरावरून रिजेक्ट झाली आहेत, त्याबाबत वैध/अवैध निर्णय संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी तात्काळ देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

आधीच दिलेल्या सूचना पुन्हा अधोरेखित

संचालनालयाने दि. 22 जानेवारी 2026 रोजीच DDO-2 लॉगिनमधून डिजिटल सर्विस रेकॉर्ड अपलोड करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र अद्याप अनेक ठिकाणी ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, याची गंभीर दखल घेण्यात आली आहे.

बैठकीनंतर कडक निर्देश

दि. 08 एप्रिल 2026 रोजी मा. आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर सर्व संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

हे ही वाचा 👇🏻  केंद्र सरकारकडून युनिफाईड पेन्शन योजना (UPS) संदर्भात नवा निर्णय – कर्मचाऱ्यांना NPS वरून UPS मध्ये ‘स्विच’ करण्याची एकदाच संधी.

या कर्मचाऱ्यांचेही वेतन थांबणार. Maharashtra Salary Update

खालील प्रकरणांमध्येही वेतन व भत्ते अदा होणार नाहीत:

  • ज्या कर्मचाऱ्यांची वैयक्तिक मान्यता किंवा शालार्थ आयडी अमान्य करण्यात आले आहे
  • ज्या प्रकरणांमध्ये तपासणी अधिक्षक ते विभागीय अध्यक्ष स्तरावर मान्यता नाकारली आहे
  • ज्या कर्मचाऱ्यांची कागदपत्रे DDO-1 स्तरावर अद्याप अपूर्ण आहेत

शालार्थ प्रणालीतील डिजिटल सर्विस रेकॉर्ड पूर्ण करणे आता सर्व कर्मचाऱ्यांसाठी अनिवार्य झाले आहे. अन्यथा वेतन थांबण्याची कारवाई निश्चित आहे. त्यामुळे संबंधित शिक्षक व कर्मचाऱ्यांनी तातडीने आपली कागदपत्रे पूर्ण करून अपलोड करणे अत्यंत आवश्यक आहे.

Follow:
नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *