Close Visit MahaNews12

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शासनाचा नवीन GR जारी, जाणुन घ्या संपुर्ण माहिती.

मुंबई : Government Staff Database :  राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची माहिती अधिक व्यवस्थित आणि अद्ययावत ठेवण्यासाठी शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी, यासाठी ‘शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष’ तयार केला जाणार आहे.

या प्रक्रियेमुळे राज्यातील सरकारी मनुष्यबळाची अचूक माहिती शासनाला उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. कोणत्या विभागात किती कर्मचारी कार्यरत आहेत, त्यांची पदे कोणती आहेत, वेतनाची स्थिती काय आहे आणि कोणती पदे रिक्त आहेत, याबाबतची माहिती एका प्रणालीत उपलब्ध होणार आहे.

कर्मचाऱ्यांची विविध माहिती ऑनलाइन भरावी लागणार. Government Staff Database

या माहितीकोषासाठी कर्मचाऱ्यांची वैयक्तिक तसेच सेवेशी संबंधित माहिती ऑनलाइन पद्धतीने नोंदवली जाणार आहे. यामध्ये कर्मचाऱ्याचे नाव, जन्मतारीख, लिंग, पदनाम, सेवेत रुजू झाल्याची तारीख, निवृत्तीची तारीख, सेवार्थ आयडी, पीएफ खाते क्रमांक, पॅन, आधार, मोबाइल क्रमांक आणि ई-मेल यांसारख्या माहितीचा समावेश आहे.

याशिवाय सामाजिक प्रवर्ग, जात, धर्म, स्वग्राम, दिव्यांगत्वाची माहिती, सध्याचे पद, पदोन्नतीची तारीख आणि जुलै २०२६ मधील वेतनाची माहितीही नोंदवली जाणार आहे.

माहिती भरण्यासाठी निश्चित कालावधी

संबंधित कार्यालयांना ऑनलाइन प्रणालीचा वापर करण्यासाठी लॉगिन आयडी आणि पासवर्ड उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांची माहिती ऑनलाइन भरण्याची प्रक्रिया सुरू होईल.

१५ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत माहिती भरून पहिले प्रमाणपत्र प्राप्त करायचे आहे. त्यानंतर माहितीमध्ये काही चुका किंवा दुरुस्ती आवश्यक असल्यास त्यासाठी स्वतंत्र कालावधी देण्यात आला आहे.

१ डिसेंबर २०२६ ते २८ फेब्रुवारी २०२७ या काळात आवश्यक दुरुस्त्या करून दुसरे प्रमाणपत्र घेता येणार आहे.

वेतन बिलासोबत प्रमाणपत्र देणे आवश्यक. Government Staff Database

या माहितीकोषाच्या प्रक्रियेला वेतन बिलाशी जोडण्यात आले आहे. नोव्हेंबर २०२६चे वेतन बिल सादर करताना पहिले प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहणार आहे. त्याचप्रमाणे फेब्रुवारी २०२७चे वेतन बिल सादर करताना दुसरे प्रमाणपत्र आवश्यक राहणार आहे. Government Staff Database

या प्रक्रियेत १ जुलै २०२६ रोजी सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती नोंदवली जाणार आहे. जुलै महिन्यात स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांचाही त्यामध्ये समावेश करण्यात येणार आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांची माहिती एका अद्ययावत प्रणालीमध्ये उपलब्ध झाल्यामुळे भविष्यात मनुष्यबळाचे नियोजन, वेतनावरील खर्च, रिक्त पदांची माहिती आणि विविध प्रशासकीय निर्णय घेणे शासनाला अधिक सोपे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित कार्यालयांनी दिलेल्या मुदतीत माहिती अचूकपणे भरून ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

Oplus_131072

1 thought on “सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शासनाचा नवीन GR जारी, जाणुन घ्या संपुर्ण माहिती.”

Leave a Comment