पेन्शनधारकांसाठी महत्वाची बातमी EPFO आणि IPPB मध्ये मोठा करार, होणार मोठा फायदा.

पेन्शनधारकांसाठी महत्वाची बातमी EPFO आणि IPPB मध्ये मोठा करार, होणार मोठा फायदा.

Life Certificate! : देशातील कोट्यवधी पेन्शनधारकांसाठी एक दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता वार्षिक जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) सादर करण्यासाठी बँक किंवा कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज राहणार नाही. कारण (EPFO) आणि (IPPB) यांच्यात झालेल्या करारामुळे ही सेवा थेट घरपोच उपलब्ध होणार आहे.

केंद्र सरकारच्या अंतर्गत हा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला असून, याचा थेट फायदा कर्मचारी पेन्शन योजना 1995 (EPS-95) अंतर्गत येणाऱ्या लाखो ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे. वयोमानामुळे किंवा आजारपणामुळे अनेक पेन्शनधारकांना दरवर्षी बँकेत जाऊन जीवन प्रमाणपत्र सादर करणे त्रासदायक ठरत होते. काही वेळा लांब रांगा, प्रवासाचा खर्च आणि शारीरिक अडचणींमुळे ही प्रक्रिया अधिकच कठीण होत होती.

पेन्शनबाबत १५ दिवसांत अधिसूचना निघणार , सरकारचे मोठे आश्वासन. मोठी बातमी! १८ लाख सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे. Government Employees Strike Maharashtra

मात्र आता चित्र बदलणार आहे. IPPB आपल्या देशभरातील पोस्ट ऑफिस नेटवर्कचा वापर करून ही सेवा थेट नागरिकांच्या दारात पोहोचवणार आहे. पोस्टमन किंवा ग्रामीण डाक सेवक घरपोच येऊन डिजिटल पद्धतीने जीवन प्रमाणपत्र सादर करण्यात मदत करणार आहेत. यासाठी फेस ऑथेंटिकेशन (चेहऱ्याची ओळख) आणि फिंगरप्रिंट बायोमेट्रिक पडताळणी यांचा वापर केला जाणार आहे.

हे ही वाचा 👇🏻  बँके चे नवीन नियम जाहीर, 1 तारखे पासून होणार लागू, पहा संपूर्ण माहिती. HDFC Bank New Rule

या सेवेमुळे सर्वात मोठा दिलासा म्हणजे पेन्शनधारकांना कोणताही खर्च करावा लागणार नाही. ही सेवा पूर्णपणे मोफत असून, त्याचा खर्च EPFO उचलणार आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्याही ही योजना फायदेशीर ठरणार आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही 1 ऑक्टोबर 2026 ते 30 नोव्हेंबर 2026 या कालावधीत जीवन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. मात्र यंदा ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि त्रासमुक्त होणार आहे.Digital Life Certificate!

एकूणच, सरकारचा हा निर्णय “सेवा तुमच्या दारात” या संकल्पनेला खरी उतरवणारा ठरत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील आणि वृद्ध पेन्शनधारकांसाठी ही सुविधा मोठा आधार ठरणार आहे. आता पेन्शनसाठीची प्रक्रिया अधिक सुलभ, जलद आणि नागरिकाभिमुख बनत असल्याचे चित्र दिसत आहे.

Leave a Comment